स्नेहलच्या गायिकीला रसिकांची जल्लोषात उत्स्फूर्त दाद,,,,,,!




वरोरा(प्रति) :- वरोरा येथील एका शाही विवाह प्रसंगी स्नेहल शिरसाट हिने सादर केलेल्या गीताला तिच्या गायिकेला रसिकांनी जल्लोषात उत्स्फूर्त दाद दिली,,
दि.१२/०२/२०२२रोजी अलिशान सिलिब्रेशन मॅरेज हॉल वरोरा येथे पार पडलेल्याआयु. आनंद कांबळे यांच्या मुलाचा शाही विवाह  सोहळा पार पडला या स्वागत समारंभात संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेले सुप्रसिद्ध गायक, निवेदक हेमंत शेंडे आणि संच प्रस्तुत यांच्या स्वरगंध ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.
            सदर कार्यक्रमात वरोरा येथील गायिका स्नेहल सुनील शिरसाट चंद्रपूर येथील गायक अजय कवाडे तसेच गायिका शिल्पा अलोने या गायक कलावंतांसह सिंथेसायझर वादक संघपाल मुंढे  ऑक्टोपॅड वादक संदीप मंडल ढोलक वादक कृष्णा अँकर प्रजेस घडसे यांच्यासह इतरांनी गीत संगीताची बेधुंद उधळण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले,,  
मा, हेमंत शेंडे आणि संच प्रस्तुत जागर समतेचा या कार्येक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रभर समाज जनजागृतीचे व प्रबोधनाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे,काही दिवसांपूर्वीच हेमंत शेंडे यांनी स्नेहलला त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी केले होते.तिच्या गायिकीला सोशल मीडिया तसेच विविध स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून तिच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments