वरोरा येथील रत्नमाला चौकात पाणपोईचे उद्घाटन

वरोरा येथील रत्नमाला चौकात पाणपोईचे उद्घाटन





 वरोरा (प्रती)
     
दि.२ मे २०२४ ला वरोरा शहरातील नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील रत्नमाला चौकात प्रवाशांची सतत वर्दळ असते. त्यामुळे सध्या उन्हाचा पारा वाढलेला असताना प्रवाशांना पिण्याचे पाण्याची सोय व्हावी याकरिता भागवत आयोजन समिती, वरोरा आणि विदर्भ महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
         महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या या दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या या पाणपोई च्या सोयीमुळे ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांना यामुळे थंड पाणी प्यायला मिळणार आहे. सध्या दररोज 25 थंड पाण्याच्या कॅन या ठिकाणी ठेवल्या जात असून हा उपक्रम पुढील दोन महिने सुरू राहील असे आयोजकांनी सांगितले. 
      याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विलास टिपले, माजी नगरसेवक छोटू शेख,  विदर्भ महिला बँकेचे विजय गोटे,  डॉ गुणवंत भोयर,  प्रभाकर अडवाले तसेच भागवत आयोजन समितीचे प्रा राजेश कावलकर,  नरेंद्र डोईजड,  श्याम टोकसीया, सुभाष दादंडे,नरेश जयस्वाल, संतोष पवार, गजानन शेळके,  जयंत बंडावार ,  डॉ. खारोडे, प्रा प्रशांत खुळे, विलास कावलकर आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments