कोरपन्यात प्लॅनिंग मर्डर?


मास्टर माईंड राऊतावर संशय
पत्नी पोलिसांच्या ताब्यात
कोरपना(प्रती)  प्रेम प्रकरणातून प
त्नीनेच आपल्या पतीला ठार केले असा दाट संशय निर्माण होत असून सदर घटना कोरपन्यापासून २कि,मी अंतरावर असलेल्या धोपटाळा (पारधी गुडा) येथे दि.१६मार्च रोजी रात्री११:३०वाजताच्या दरम्यान घडली , संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असता  पोलीस कसून तपास करीत आहेत,
कोरपना(प्रती)धोपटाळा (पारधी गुडा )येथील रहिवासी रमेश परमदास नन्नावरे(३७) याचा विवाह सुरेखा हिच्यासोबत सोळा वर्षांपूर्वी झाला होता ,त्यांना चार अपत्ये आहेत त्यांच्या तीनही मुली नातेवाईकाकडे  राहतात व सर्वात लहान मुलगा वडिलांकडे राहत होता,  सुरेखाचे  अश्विन ऋषीदास नन्नावरे रा. चिंधीमाल तालुका नागभीड याच्यासोबत प्रेमाचे संबंध होते, असा आरोप  मृतकाच्या  भावाने केला आहे, व ती आणि अश्विन हे दोघे आठ महिन्यापूर्वी पळून गेले होते, आणि काही दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीच्या घरी परत आली, याच दरम्यान दोघांचे कडाक्याचे भांडण सुद्धा झाले होते,कोरपना येथील रहिवासी राऊत याच्या मध्यस्थीने प्रकरण सोडविण्यात आले , परंतु सदर राऊत नावाच्या व्यक्तीनेच पळून जाण्यास त्या दोघांना मदत केली असा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे  दि. 16 मार्च रोजी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान रमेश नन्नावरे  हा झोपेत असताना ,त्याला झटके येत आहेत, असा बनाव करत शेजारी राहणाऱ्या सुधाकरला  सुरेखाने बोलावले परंतु  रमेश हा आधीच मरण पावला होता,असे मृतकाच्या भावाने सांगितले,रमेश ला कोणाच्या सांगण्यावरून ठार केले, याचा मास्टर माईंड कोण?की सुरेखानेचे प्रेमात अडसळ निर्माण होत आहे म्हणून झोपेत असतांनाच रमेशला मारले,याचा कोरपना पोलीस तपास करीत आहेत,

Post a Comment

0 Comments