नामशेष होत असलेल्या माळढोक पक्ष्याकरिता सेंद्रिय आणि जैविक शेती उपयुक्त -प्रशांत खाडे

नामशेष होत असलेल्या माळढोक पक्ष्याकरिता सेंद्रिय आणि जैविक शेती उपयुक्त -प्रशांत खाडे 
माळढोक संवर्धन व संरक्षणार्थ रॅलीद्वारे जनजागृती
      

वरोरा(प्रती)   चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर , वनविभाग चंद्रपूर व वन परिक्षेत्र वरोरा च्या वतीने आज दि, ७ मार्च २०२२ ला स्थानिक धनोजे कुणबी समाज मंगल कार्यालयात " माळढोक संवर्धन व संरक्षण कार्यक्रमाचे " सकाळी 8-00 वाजता भव्य आयोजन करण्यात आले . 
                कार्यक्रम स्थळी पोहचण्यापूर्वी वरोरा वन परिक्षेत्र कार्यालयापासून ते वरो-यातील प्रमुख रस्त्यांवरुन जनजागृतीपर भव्य बाईक रॕलीचे  कुणबी सभागृहापर्यंत आयोजन करण्यात आले होते .
              प्रशांत खाडे , विभागीय वन अधिकारी चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कु. निकीता चवरे , सहाय्यक वनसंरक्षक ( तेंदू ) वनविभाग चंद्रपूर , सुभाष शिंदे - उपविभागिय अधिकारी वरोरा , मकवाणे मॕडम तहसिलदार वरोरा , राजेश राठौड संवर्ग विकास अधिकारी वरोरा , मृणाल काळे - प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा , लालसरे साहेब - सेवानिवृत्त वनपाल  वरोरा , डाॕ प्रकाश महाकाळकर - गटशिक्षणाधिकारी वरोरा , छोटूभाई शेख - सामाजिक कार्यकर्ते वरोरा ,  मडावी साहेब - पोलीस अधिकारी वरोरा उपस्थित होते .
            अध्यक्षीय स्थानावरुन बोलतांना प्रशांत खाडे सरांनी माळढोक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गात असल्यामुळे त्याचा अधिवास म्हणून ओळख असलेल्या वरोरा वनपरिक्षेत्रातील  स्थानिक शेतक-यांनी सेंद्रीय व जैविक शेती केल्यास निश्चितच माळढोक पक्षाचे संवर्धनास मदत मिळेल . सारस पक्षी नामशेष झालेला आहे . सारस पक्षा प्रमाणे माळढोक पक्षाची अवस्था होवू नये यासाठी केवळ वनपरिक्षेत्र अधिका-यांनीच प्रयत्न करुन चालणार नाही तर यात स्थानिक शेतकरी शेतमजूर विद्यार्थी शिक्षक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनीही योगदान देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले .
              कु निकीता चौरे म्हणाल्या की अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची वेळ आपल्यावर आली या विषयी खंत व्यक्त करतांना नामशेष होण्याच्या मार्गात असलेल्या माळढोक च्या संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी केवळ वनपरिक्षेत्र अधिका-यांवरच टाकून चालणार नाही तर हे जनजागृती अभियान ग्रामिण भागात रुजले पाहिजे व सर्व स्तरातून या अभियानाला मदत मिळाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले .

          उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे साहेबांनी याप्रकारचे कार्यक्रम वनोजा मार्डा जेथे गेल्या काही दिवसांपासून माळढोक नजरेस आलेले आहेत अशा परिसरातील लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले .
             मृणाल काळे यांनी अशाप्रकारचे कार्यक्रम ज्या भागात माळढोक चा अधिवास आहे त्या ठीकाणी घेतल्यास जास्त प्रभावी ठरतील असे सांगतांनाच वाढत्या शहरीकरणाचा या अधिवासावर परिणाम होत असल्यामुळे शहरीकरणासाठी जमिन उपलब्ध करुन देत असतांना या अधिवासांना सुरक्षित ठेवता येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत याकडे लक्ष वेधले .
           विजय काळे यांनी जैविक शेती व सेंद्रीय शेती याविषयी मार्गदर्शन करत असतांनाच याकडे शेतक-यांनी लक्ष देण्याची गरज आहे त्याचप्रमाणे जमिनीचा पोत वाढविण्यासाठी लेंडी खत , गांडूळ खत निर्मितीविषयी मार्गदर्शन केले .
              प्रविण खिरटकर यांनी या संदर्भात पत्रकार संघाच्या वतीने जनजागृतीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले .
तसेच गोपालराव ठोसर पक्षीमित्र नागपुर यांनी भ्रमण ध्वनिवरुण कार्यक्रमच्या यशस्वीततेसाठी शुभेछा देण्यात आल्या.

           माळढोक संरक्षण व संवर्धनासाठी स्थानिकांचे सहकार्य मिळावे यासाठी माळढोकचा अधिवास जिथे आहे अशा ठिकाणच्या दहा गावांतील . जि. प.  शाळांमधील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा स्कूलबॕग देवुन सन्मान करण्यात आला . वरोरा परिक्षेत्रातील पोलिस पाटील सरपंच  सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांचाही शाॕल श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला . 
        एम. पी. राठौड ,   वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांच्या नेतृत्वात एम. एन. निबुद्धे , व्ही. पी. रामटेके , के. बी. देऊळकर , डी. बी. चांभारे , ए. ई. नेवारे , एस डी डोर्लीकर , आय. डब्लू लडके , एस. डी. वाटेकर , बी. जी. केजरकर , एस. व्ही. वेदांती , विद्या सोरते , एस. व्ही.मसराम व संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले .     
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघराज निबुद्धे ,वनपाल यांनी तर आभार प्रदर्शन अमोल नेवारे वनरक्षक व सूत्रसंचलन गोपाळ गुडधे यांनी केले .

Post a Comment

0 Comments