अभाविप चंद्रपूर तर्फे राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांचे उत्साहात स्वागत

अभाविप चंद्रपूर तर्फे राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांचे उत्साहात स्वागत



चंद्रपूर (प्रती) तामिळनाडू मध्ये लावण्या नावाच्या बालिकेला इसाई धर्मांतर करण्याकरीता जबरदस्तीने दबाव टाकल्या मुळे त्या बालिकेनी आत्महत्या केली.  हे समाजाला लाज  आणणारा प्रकरण पुर्ण देशाला माहित आहे. तामिळनाडू सरकार लावण्याला न्याय देण्याच्या मानसिकतेत दिसत नव्हती हे पुर्ण  देश बघत होता व कोणीही या प्रकरणाचे गांभीर्य तामिळनाडू सरकारला समजवण्याच्या मानसिकतेत दिसत नव्हते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने पुर्ण देश भरात आंदोलन  उभे केले व याचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून दिले  व लावण्याला न्याय देण्याची मागणी अभाविप च्या पुर्ण देशातल्या कार्यकर्त्यांनी तामिलनाडू सरकारला केली. याच साठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॉलीन यांच्या  बंगल्याच्या पुढे आंदोलन करत असतांना अभाविप राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांच्या सोबत ३३ कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने  खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली होती व १४ दिवस कारावासात  चुकीच्या आरोपांमध्ये  त्यांना तामिळनाडू सरकारने ठेवले. पण सत्य त्रासू शकतो पण पराभूत नाही हे सर्व कार्यकर्त्यांना माहित होते आणि त्यांची सुटका झाली. याच अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपुर तर्फे  राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांचे कार्यकर्त्यांनी बल्लारपूर  रेल्वे स्टेशन येथे स्वागत केले. यावेळी प्रविण गिलबीले, आशुतोष द्विवेदी, शैलेश दिंडेवार, अमोल मदने, बाळा भडगरे, पियुष बनकर, तन्मय बनकर ,रामेशवर माळगी  आदी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments