वरोऱ्यात रोजगार व स्वयंरोजगार कामगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

वरोऱ्यात रोजगार व स्वयंरोजगार कामगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन   
रमेश राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभणार 
वरोरा(प्रती)मागील काही दिवसात बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना रोजगाराच्या संधी बाबत माहिती व्हावी या उद्देशाने जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोरा व संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन 1 मे रोजी सकाळी १० वाजता स्थानिक सिद्धिविनायक मंगल कार्यालय (पोलिस स्टेशन समोर) खांजी वॉर्ड वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार तसेच इमारत बांधकाम कामगारांना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ,मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती गुरुदेव स्वच्छ जल संस्था अध्यक्ष तसेच रुलर चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचे उपाध्यक्ष रमेश राजूरकर व संघर्ष इमारत बांधकाम कामगार संघटना बोर्डाचे  संस्थापक अनिल कुमरे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारा केलीआहे ,
यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्याच सोबत सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरीसाठी मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे मेळाव्याचे उद्घाटन स्व, श्रीनिवास शिंदे मेमोरेबल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष रवींद्र शिंदे करणार आहेत अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष एड,मोरेश्वरराव टेमुर्डे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे कार्यकारी अभियंता अमिताभजी पावडे गवंडी ,बांधकाम मजदूर युनियनचे अध्यक्ष प्रशांत रामटेके, जय गुरु स्वच्छ जल संस्था अध्यक्ष तसेच रुलर चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचे उपाध्यक्ष रमेश राजूरकर मार्गदर्शन करणार आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सीएसी महा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष पांडुरंग गावंडे ,माजी उपसभापती तसेच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता बोरकर ,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा कुंभारे , भटाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर रोहणकर यांची उपस्थित राहणार आहे तरी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश राजूरकर यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments