वरोऱ्यात जाहीर व्याख्यान, भव्य सत्कार आणि बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धा

वरोऱ्यात जाहीर व्याख्यान, भव्य सत्कार आणि बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धा


 अँड. वैशालीताई डोळस उपस्थित राहणार
वरोरा(प्रती)बुद्ध पौर्णिमा आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या  स्मृतिप्रीत्यर्थ महाकवी वामनदादा कर्डक कृती समिती वरोऱ्याच्या वतीने जाहीर व्याख्यान मान्यवरांचा भव्य सत्कार तसेच बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन दि.१६/०५/२०२२रोज सोमवारला दु,४:००ते सायं १०वाजेपर्यन्त स्थळ-डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथे करण्यात आले आहे,
पाहिले सत्र - बुद्ध -भीम गीत गायन स्पर्धा दु.४:००ते सायं६:००वाजेपर्यन्त या सत्राचे उदघाटन आयु .सुशील भाऊ देवगडे(नगरसेवक ,न. प भद्रावती)यांच्या हस्ते करण्यात येणार असून या स्पर्धेत१०वर्षावरील सर्वच स्पर्धक भाग घेऊ शकतात.व सहभागी सर्वच स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
दुसरे सत्र-जाहीर व्याख्यान व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, वेळ सायं ६:००ते१०वाजेपर्यन्त व्याख्यानाचा विषय-बहुजन समाजाचा मुक्तीपथाचा मार्ग आणि आव्हाने हा असून सदर सत्राच्या स्वागताध्यक्षा आयुष्यमती.शोभाताई वेले ,(जेष्ठ कवयित्री नागपूर)कार्येक्रमाच्या अध्यक्षा. आयुष्यमती ,अँड, वैशालीताई डोळस (परिवर्तनवादी विचारवंत,औरंगाबाद) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. जावेद पाशा सर(फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे गाढे अभ्यासक, नागपूर) उपस्थित राहणार आहेत, तसेच आंबेडकरी चळवळीतील काम करणारे जेष्ठ मान्यवर आयु. केशवराव ठमके,आयु. विठ्ठल उर्फ नेताजी बुरचुंडे, आयु. अँड मनोहर पाटील यांचा समाजाच्या व मान्यवरांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे, तरी या कार्येक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वामनदादा कर्डक कृती समितीचे वरोराचे  आयोजक आयु, दशरथ शेंडे,(अध्यक्ष) सुनील शिरसाट,(सचिव) पदाधिकारी -शिलास पुनवटकर, अमर गोंडाने ,हितेश राजनहिरे, चंदन करमरकर, संजय गायकवाड,  विश्वदीप गोंडाने, निशांत पाटील, , हितेंद्र तेलंग,प्रेम मुंजनकर ,अहेफाज शेख तसेच आयुष्यमती,सरलाताई ठमके,वंदना मून, मेघा भालेराव, प्रतिभा कुंभारे, पुष्पा साठे,पुष्पा पाटील, उषा मून, ज्योत्स्ना खोब्रागडे यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments