या देशात राजकारण्यांच्या नव्हे तर विचारवंतांच्या हत्या होतात-अँड, वैशाली डोळस

या देशात राजकारण्यांच्या  नव्हे तर विचारवंतांच्या हत्या होतात-अँड, वैशाली डोळस
वरोरा (प्रती)स्वातंत्र्यापूर्वी देशाची जडण घडण सामाजिक, आर्थिक राजकीय विषमतेवर आधारित
 असल्याने याची झळ सामान्य माणसाला सातत्याने पोहचत होती . ही विषमतेची दुरी नष्ट करण्यासाठी आजपर्यंत अनेक महापुरुषांनी आणि साधुसंतांनी प्रयत्न केले परंतु या देशातील मूठभर प्रस्थापित समाजव्यवस्थेने  राजकारण्यांशी हातमिळवणी करून ही सामाजिक विषमता जोपासण्याचे सातत्याने प्रयत्न केले , प्रसंगी प्रस्थापित राजकारण्यांना जे जे समाज सुधारक किंवा विचारवंत डोईजड वाटत त्यांना संपवण्याचे कटकारस्थान सातत्याने होत गेले, मग ते संत तुकाराम असो की महात्मा फुले असो की आजचे डॉ.नरेंद्र दाभोळकर,कॉ, गोविंद पानसरे, एम ,एम कलबुर्गी,गौरी लंकेश  रोहित वेमुला यांचे बळी घेतल्या गेले आहेत, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांचा बळी गेल्याची नोंद इतिहासात नसून फक्त या देशात विचारवंतानाच  संपविल्या जात आहे किंबहुना बळी घेतल्या जात आहेत, असे परखड मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून अँड,वैशाली डोळस यांनी व्यक्त केले.महाकवी  वामनदादा कर्डक कृती समिती वरोरा व्दारा आयोजित  दि,  १६मे २०२२रोजी डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथे  बुद्ध जयंती व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ  व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदावरून अँड ,वैशाली डोळस बोलत होत्या , 
सदर कार्येक्रमाचे  उदघाटक सुशीलभाऊ देवगडे(नगरसेवक न. प भद्रावती) कार्येक्रमाच्या अध्यक्षा अँड वैशाली डोळस,(परिवर्तनवादी विचारवंत औरंगाबाद)स्वागताध्यक्षा, शोभा वेले (जेष्ठ कवयित्री नागपूर)तर प्रमुख मार्गदर्शक प्रा, जावेद पाशा सर( फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे गाढे अभ्यासक, नागपूर) विचार मंचावर उपस्थित होते, 
आपल्या विषयाची मांडणी करताना पुढे त्या म्हणाल्या कधी भीमा कोरेगाव प्रकरणाचा तर कधी मशिदीवरील भोंगे यावरून वाद उकरून काही प्रस्थापित काही राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील धार्मिक वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला ,जाती-धर्मांमध्ये दंगली घडविण्याचा डाव  आखण्याचा प्रयत्न झाला ,परंतु महाराष्ट्रातील बहुजन समाजाने आपले मानसिक संतुलन बिघडू दिले नाही, त्याचे मनसुबे उधळून लावले व महाराष्ट्र राख होण्यापासून वाचविले यावरून महाराष्ट्रातील बहुजन समाज जागृत होतांना दिसत आहे, हे परिवर्तनवादी चळवळीचे यश होय, आता या जागृतीचे रूपांतर सत्तापरिवर्तनामध्ये व्हायला पाहिजे म्हणजे जातीवादी सत्ताधार्‍यांना सत्तेवरून खाली खेचता येईल व राज्याची व देशाची भरभराट होईल ,यावेळी प्रा. जावेद पाशा सर यांनीही आपल्या ओजस्वी वाणीने महाराष्ट्रातील व देशातील आजच्या बाधीत झालेल्या परिस्थितीचा खरपूस समाचार घेतला व बहुजन समाजाला एकत्र येण्याचे व प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याचे आवाहन केले, यावेळी शहरातील आंबेडकरी चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळणारे ज्येष्ठ कार्यकर्ते  केशवरावजी ठमके ,नेताजी उर्फ वि, तू, बुरचुंडे  व  डॉ. नेहा टिपले यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले ,महाकवी वामनदादा कर्डक यांच्या  कार्यांना उजाळा देण्यासाठी समितीच्या वतीने बुद्ध- भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,यात प्रथम क्रमांक  धर्मदास जीवने  द्वितीय क्रमांक कु, स्नेहल शिरसाट आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्वप्नील पाटील यांना देण्यात आले, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पळवेकर सर तर आभार समितीचे अध्यक्ष  दशरथ शेंडे यांनी मानले अनिल शृंगारे यांनी आपल्या उत्कृष्ट संचालनद्वारे सर्वांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दशरथ शेंडे ,सुनील शिरसाट अमर गोंडाने,शिलास पुनवटकर, विश्वदीप गोंडाने,हितेश राजनहिरे,प्रेम मुंजनकर वंदना मून,मेघा भालेराव ,उषा मून ,पुष्पा साठे ,पुष्पा पाटील,प्रतिभा कुंभारे व इतरांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला,

Post a Comment

0 Comments