गुलाब शेंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

गुलाब शेंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार 



वरोरा(प्रती)' गुलाब सहीं मे हमारे स्कुल के गुलाब थे। रंग में काले सहीं , महक में लाजवाब थे।' असा प्रास्ताविक मध्येच मुख्याध्यापक मा.विजय भसारकर यांनी ज्यांच्या कार्याचा परिचय करून दिला असे गुलाब ताराचंद शेंडे , सामाजिक कार्यकर्ता,आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवन दि.30/09/2022  ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. शाळेच्या सभागृहामध्ये सर्व विद्यार्थी , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी तसेच त्यांचा सहचारीणी सौ.  लता शेंडे , त्यांच्या मुली व आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
        मान.सुधाकर कडू, विश्वस्त महारोगी सेवा समिती आनंदवन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले.आपल्या मनोगतात त्यांनी श्री.शेंडे यांनी संस्थेला व शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल मुक्तकंठाने स्तुती केली. या प्रसंगी उभय दांपत्य व त्यांच्या मुलींचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना  थोडावेळ ते भावुक झाले. खेड्यातून व गरीब परिस्थितीतून आल्यामुळे स्वतःला सिद्ध करायला उशीर झाला परंतु संस्थेने विश्वास दाखवून संधी दिली याबद्दल आभार व्यक्त केले.  वाट्याला आलेले काम जिद्दीने व तळमळीने पूर्ण केले व सर्वांचे सहकार्य लाभले त्यामुळेच वाटचाल यशस्वी झाली असेही ते म्हणाले. मनोगतात त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या दोन्ही मुख्याध्यापकाचा आवर्जून उल्लेख केला.
          या प्रसंगी अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सेवकराम बांगडकर, संधिनिकेतन कर्मशाळेचे अधिक्षक श्री.रवींद्र नलगिंटवार, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या टांगे हे सुद्धा मंचावर उपस्थित होते व त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.
महारोगी सेवा समिती , आनंदवन चे सचिव आदरणीय डाॅ. विकासभाऊ  यांचा संदेश श्री. रवींद्र मसराम यांनी वाचून दाखवला.
          कार्यक्रमाला ब-याच जुन्या शिक्षक कर्मचा-यांनी हजेरी लावली. शाळेच्या वतीने पुष्प देऊन त्यांचा सन्मान  करण्यात आला. सेवानिवृत्त विशेषशिक्षक श्री. दीपक  शिव यांनी श्री. शेंडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. शाळेचे वाचाउपचार तज्ज्ञ श्री. रविकांत  घोलप यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उमेश घुलक्षे यांनी केले तर श्री.सुहास देवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम सुयोग्यपणे कर्णबधिरांच्या सांकेतिक भाषेत मुलांपर्य॔त पोहचविण्याचे काम कु. सीमा बावणे यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचा-यांचे  कार्यक्रमाच्या आयोजनात  मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी संस्थेचे सचिव मा.डाॅ.विकासभाऊ व भारतीवहीनी यांचे आशीर्वाद प्राप्त झाले व संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ दादा व पल्लवीताई यांनीही सदिच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments