पोलिस स्टेशन शेगाव (बु) येथे नवरात्रीच्या पर्वावर महिलांसाठी गरबा डांडीया उत्सवाची मांदियाळी

पोलिस स्टेशन शेगाव (बु) येथे नवरात्रीच्या पर्वावर महिलांसाठी गरबा डांडीया उत्सवाची मांदियाळी







वरोरा(प्रती)शेगाव ( बु ) येथे दि.  2 ऑक्टोबरला  लाल बहादुर शास्त्री  व गांधी जयंती तसेच जागतिक शांतता दिवसाचे औचित्य साधून शांतता कमेटी आणि पोलिस स्टेशन शेगाव (बू ) यांच्या सयुक्त विद्यमाने  नवरात्र उत्सव कार्यक्रम घेण्यात आला. हा उत्सव शेगाव (बु )येथे प्रथमच होत असल्याने महिला मध्ये  उत्साह दिसत होता व या गरबा डांडिया उत्सवात शेगाव (बु ) येथील 23 दुर्गा महिला मंडळाच्या टीमनी सहभाग घेऊन  गरबा नृत्य  करून आपला आनंद व्यक्त केला. तसेच  ग्रामिण  भागातील महिलानी गरबा नृत्य करून  येथील जनतेचा आनंद दिगुणीत् केला व गावातील लोकांनी पण कार्यक्रमाला  मोठ्या संखेनी
 उपस्थित राहून अभुतपूर्व प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याची करिता शांतता कमेटी सदस्यांनी आणि पोलीस स्टेशन शेगाव (बु) येथील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेउन् कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमा सोबतच या वर्षी झालेल्या मस्कऱ्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील ज्या गणपती मंडळांनी सुंदर डेकोरेशन आणि शांततेत मिरवणूक काढून शांतता कमिटी याना सहकार्य केले अश्या गणपती मंडळांना बक्षिस वितरण  पोलीस स्टेशनचे ठाणेदार Api अविनाश मेश्राम सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये ज्या गणपती मंडळ ने आपले गणपती मंडळ सुरुवातीला काढून शांतता कमिटी यांना मदत केली असे 
ओम साई मस्कऱ्या गणेश मंडळ यांना पाहिले बक्षीस देण्यात आले. 
दुसरे बक्षिस
न्यू शक्ति मस्कऱ्या गणेश मंडळ कुंभार मोहल्ला आणि
तृतीय बक्षिस
श्री मस्कऱ्या गणेश मंडळ याना देण्यात आले.

डांडिया गरबा उत्सवात सहभागी सर्व स्पर्धकांना खूप सुंदर परफॉर्म केल्याने सर्व दुर्गा देवी मंडळला प्रोसाहन बक्षिसे शांतता कमेटी आणि व्यापारी संघटना यांनी देऊन स्पर्धकांचा आनंद द्विगुणित केला.   दांडिया-गरबा स्पर्धा घेण्याचे मुख्य हेतू हा होता की दुर्गा देवीचा उत्सव हा नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे आणि महिलांचे या माध्यमातून  या नऊ दिवसामध्ये त्यांचे मनोरंजन झाले पाहिजे. 
आधी मस्कर्या गणपती विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी शांतता कमिटी शेगाव (बू )यांनी खूप मोलाचे सहकार्य केल्याने आणि दांडिया - गरबा कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन केल्याने सपोनी मेश्राम ठाणेदार शेगाव( बू) पोलिस स्टेशन यांनी सर्व शांतता कमिटी यांचे खूप खूप आभार मानले.  या कार्येक्रमाचे अध्यक्ष   पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि मेश्राम सर तर प्रमुख अथिति पोउपनि जाधव सर होते. 
कायक्रमाचे प्रस्ताविक पेटकर सर आणि संचालन सौ सुकेशनी माकोडे यानी केले व आभार प्रदर्शन  सुधीर चिकटे सरांनी केले.

Post a Comment

0 Comments