वरोरा येथे 15डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान पुरुष व महिलांचे राज्यस्तरीय वाली बॉल स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

वरोरा येथे 15डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान पुरुष व 
महिलांचे राज्यस्तरीय व्हॅलीबॉल बॉल स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन




वरोरा(प्रती) कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोरा व महारोगी सेवा समिती आनंदवनयांच्या वतीने महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या मार्गदर्शनात 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर यादरम्यान पुरुष व महिलांचे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल सामने तथा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आनंद निकेतन महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे
या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्रातील महिलांचे 30 तर पुरुषांचे 35 वरिष्ठ व्हॉलीबॉल संघ सहभागी होणार आहे स्पर्धेकरिता आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या पटांगणावर पाच व्हॉलीबॉल मैदाने तयार करण्यात येणार असून स्पर्धा दिवसा व रात्री विद्युत प्रकाश झोतात खेळवल्या जाणार आहेत स्पर्धेत 9 00 पुरुष महिला खेळाडू पंचव्यवस्थापक प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहे खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था आनंदवनात करण्यात येणार आहे यासोबतच सायंकाळच्या सतरा  नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे स्पर्धेच्या ठिकाणी खाद्य वस्तू विक्री व इतर स्टॉल लावण्यात येणार आहे स्पर्धेदरम्यान अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार असून स्पर्धेला भेट देण्याकरिता अनेक मान्यवरांनी आपला होकार आयोजकाकडे दिला आहे स्पर्धेची तयारी महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉक्टर आर आर महाजन स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे सचिव सुनील जवदंड स्पर्धेचे मुख्य संयोजक अनुप पोटे स्पर्धा संयोजक प्राध्यापक तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी सदस्य व खेळाडू करीत आहे

Post a Comment

0 Comments