२६रोजी संविधान दिन समारोह

२६रोजी संविधान दिन समारोह

आस्था बुद्धिस्ट महिला ग्रुपचे आयोजन



वरोरा(प्रती) लोकशाही राज्य घडविणारे जगातील अद्वितीय भारतीय संविधान घटनाकाराच्या अविरत परिश्रमातून दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला भारत देशाने अधिनियमित करून अंगीकृत  केले याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो व याचाच एक उत्सव म्हणून संविधान दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या समारोहमध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधान सन्मान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ सुद्धा आयोजित करण्यात आला आहे ,दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोज शनिवारला सकाळी ८:३० वाजता स्थळ -रत्नमाला चौक वरोरा येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाच्या उदघाटिका  म्हणून आयु .ऐश्वर्याताई खामनकर (सरपंच ग्राम पंचायत बोर्डा )कार्येक्रमाच्या अध्यक्षा आयु .पुष्पा पाटील (अध्यक्षा आस्था बुद्धिस्ट महिला ग्रुप वरोरा,बोर्डा) प्रमुख अतिथी आयु प्रा.सुचिता खोब्रागडे( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वरोरा) आयु ऍड.ममताताई मेश्राम( जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वरोरा) आयु,सुजाता लाटकर (केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर) तरी या कार्यक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा असे आव्हान आस्था बुद्धिस्ट महिला ग्रुप वरोरा-बोर्डा यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments