दुचाकीच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू
  
 महामार्गावरील पोहना बीजगुनन केंद्रा समोरील घटना






वडनेर(प्रती) ७ नोव्हेंबरच्या सायंकाळी सातच्या सुमारास पोहना येथून वडकीकडे  सायकलने जात असणाऱ्या ईसमास मागून भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकीने जबरदस्त धडक दिली या धडकेत सायकल स्वार गंभीर रीत्या जखमी झाला वडनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव विठ्ठल नानाजी खेकारे असे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील विठ्ठल नानाजी खेकारे वय (४५) हे ७ नोव्हेंबर रोजी पोहना येथे नातेवाईकांकडे आले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरून  पोहना येथून वडकी मार्ग वरोराकडे जात असता सिंदी (रेल्वे) येथील दुचाकी क्रमांक एम. एच. ३२ ए- बी-२४६१ या वाहन चालकाने आपली ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने  चालवून सायकल स्वारास  मागून जबरदस्त धडक दिली. या धडकेत सायकल स्वार विठ्ठल नानाजी खेकारे गंभीरित्या जखमी झाले त्याला उपचारासाठी वडनेर च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराला दाद न देता त्याचा मृत्यू झाला. 
याबाबत वडनेर पोलिसांनी दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून  मृताची ओळख काही वेळापर्यंत पटू न शकल्यामुळे मृतदेह हिंगणघाट येथे फ्रिझर मध्ये ठेवण्यात आला होता.
पुढील तपास वडनेर ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोनपितरे, सहाय्यक पोलीस कर्मचारी मनोज धात्रक करीत आहे.

Post a Comment

0 Comments