माजी खा.हंसराजभैया अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा तर्फे भव्य मॅराथॉन स्पर्धा आयोजित

माजी खा.हंसराजभैया अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा तर्फे भव्य मॅराथॉन स्पर्धा आयोजित 









वरोरा(प्रती) शांत व  प्रेमळ  स्वभावाचे  आपल्या  कामाच्या माध्यमातून संसदपटू म्हणून  लौकिक असलेले  पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराजभैय्या अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त  वरोरा तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा  व Airbron trening ceneter द्वारे भव्य मॅराथॉन स्पर्धा दिनांक ११ नोव्हेंबर रोज शुक्रवार सकाळी ६ ला वरोरा येथे आयोजित केली आहे या  स्पर्धेत  दोन  गटामध्ये  *बक्षीस ठेवली गेली आहे  पुरुष गटात  प्रथम पुरस्कार ५००१ रुपये रोख द्वितीय पुरस्कार ३००१ रुपये व तृतीय पुरस्कार २००१ रुपये रोख तसेच महिला गटात प्रथम पुरस्कार ५००१ रुपये रोख द्वितीय पुरस्कार ३००१ रुपये व तृतीय पुरस्कार २००१ रुपये रोख असे पारितोषिक ठेवले आहे* मॅराथॉन ला सुरवात ठीक सकाळी ६ ला आनंदवन चौक येथून पुढे रत्नमाला चौक,  उडान पूल चडून साई मंगल कार्यालय एकर्जुना चौक,  आझाद वॉर्ड-मित्र चौक डोंगरगाव चौक ते आंबेडकर चौक येथे स्पर्धा संपन्न होईल व  या स्पर्धे नंतर लगेच आंबेडकर चौक इथे विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात येणार आहे. *या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री. देवरावजी भोंगळे*,जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष हे हजर राहणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा उपरुग्णालय इथे फळ वाटप तसेच ब्लॅंकेट वाटप सुद्धा  करण्यात येणार आहेत  ह्या मॅराथॉन स्पर्धा मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चा वरोरा तालुका शहर व  ग्रामीण द्वारा करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments