बामणी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बामणी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी  


     चंद्रपूर(प्रती)      जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बामणी (दू) तालुका - बल्लारपूर येथे," महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या "डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था" या स्वायत्त संस्थेमार्फत, बल्लारपूर तालुका- समतादूत कु.अस्मीता गौतम वनकर यांच्या वतीने दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या जिवनपटावर प्रकाश टाकण्यात आला . तसेच त्यांनी केलेल्या संघर्ष आणि ज्योतिबा फुले यांच्या निधनामुळे झालेली पोकळी भरून काढण्यासाठी केलेले कष्ट व त्या कष्टाला आणि हाल अपेष्ठांना आज आलेली फळं या विषयावर बल्लारपूर तालुका समतादूत कु.अस्मीता गौतम वनकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर लघुपट सादर केला.तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आयोजित करुन यशस्वी करण्यासाठी श्री. रमेश टेंभुर्णे (मुख्याध्यापक), सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांनी परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments