पडोली पोलिसांनी अवैध देशी दारू पकडली

पडोली पोलिसांनी अवैध देशी दारू पकडली

3लाख 15हजाराचा मुद्देमाल जप्त 



वरोरा (प्रती )पडोली पोलिसांनी चारचाकी वाहनातील अवैध दारू नाकाबंदी करून पकडली यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून,3लाख 15हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
दि 03/07/2023 रोजी पोलिसांना गुप्त  माहिती मिळाली की, इसम नामे सुंदरसिंग उर्फ मनु दरसिंह टाक, रा. महाकाली नगरी, घुग्गुस हा सँट्रो कार  क्र. MH34 AA2447 मध्ये MIDC ते चिंचाळा मार्गे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून घग्गुस येथे  जाणार आहे, अश्या माहितीवरून पोनी सुनीलसिंग पवार, पो स्टे पडोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकिरण मडावी यांनी पोलीस स्टाफ पोउपनि अभिषेक जनगमवार, पोलीस अंमलदार/2913 प्रतीक, 1582/धीरज राठोड यांनी MIDC चौक, चिंचाळा येथे नाकाबंदी करून सदर कारला थांबवून सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारू संत्रा कंपनीचे एकूण 21 बॉक्स मध्ये 2100 नग 90 मीली क्षमतेच्या रु. 1,05,000/- च्या मुद्देमाल मिळून आला. देशी दारू रु. 1,05,000/-, सँट्रो कार कि. 2,00,000/- व आरोपीचा रिअलमी मोबाईल कि. 10,000/- असा एकूण रु. 3,15,000/- च्या मुद्देमाल जप्त केला असून कलम 65(अ), 98 मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी सुंदरसिंग उर्फ मोनू दारासिंग टाक, वय 23 वर्षे, रा. महाकाली नगरी, चंद्रपूर यास अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments