वरोरा आगार येथे विद्यार्थ्यांचे एसटी पास काढण्याकरीता होत आहे हाल

वरोरा आगार येथे विद्यार्थ्यांचे एसटी पास काढण्याकरीता होत आहेत हाल

 वरोरा आगार व्यवस्थापकास निवेदन




वरोरा : (प्रती)

      सर्वत्र शाळा कॉलेज सुरु झाल्यामुळे गाव खेडयातील ग्रामिण विद्यार्थी एसटी महामंडळाच्या गाडयानी जाणे-येणे करीत असतात. याकरीता यांना एसटी पास काढावे लागते. वरोरा तालुक्यातील सर्व ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना इतर कुठेही पास काढण्याची सुविधा नसल्यामुळे वरोरा एसटी डेपो इथुनच पास काढावा लागतो.
वरोरा एसटी डेपो कार्यालयात कर्मचारी यांची तुटवडा असल्यामुळे सर्व कामे एकच कर्मचारी बघत आहे. एक-एका विद्यार्थ्याचे पास काढण्यास वीस-पंचविस मिनीटाचा वेळ  लागत आहे. वरोरा एसटी आगार कार्यालयात विद्यार्थ्यांकरीता ना व्यवस्थीत बसण्याची सुविधा आहे ना स्वच्छ पाण्याची सुविधा आहे. 
             ग्रामिण भागातील विद्यार्थी असल्यामुळे आर्थीक परीस्थीती नसल्याने त्रैमासीक पास एकाच वेळी काढू शकत नसल्याने मासीक पास काढावे लागते. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विद्यार्थ्यांना पास काढण्यास खुप अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांचा लाईनमध्ये तातकळत उभे रहावे लागत असून भरपूरसा वेळ वाया जात आहे. असे असून विद्यार्थ्याना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
          विद्यार्थ्यांची ही समस्या बघता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, वरोरा प्रसिध्दी प्रमुख किशोर उत्तरवार व पक्षाचे कार्यकर्ते यांनी आगार व्यवस्थापक यांची तात्काळ भेट घेतली व यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावर आगार व्यवस्थापक यांनी लवकरात लवकर या विद्यार्थ्यांची ही समस्या निकाली न काढल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.
            याप्रसंगी तालुका प्रमुख दत्ता बोरेकर सह प्रसिध्दी प्रमुख किशोर उत्तरवार, उपतालुका प्रमुख अरुण महल्ले, उपशहर प्रमुख अनिल सिंग, युवासैनिक निखिल मांडवकर, ओंकेश्वर टोंगे, आशिष वनकर, युवा शिवसैनिक तसेच निलजई, नांदा, गिरोला, शेगाव, चारगाव या ग्रामिण भागातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments