अभाविपने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अभाविपने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  

नगरची कार्यकारणी घोषित 


वरोरा(प्रती)अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून आज संपूर्ण जगात परीचयास आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे च नाही तर त्यांच्या मध्ये राष्ट्राप्रती सामजिक भाव निर्माण करण्याचं कार्य निरंतर करत आहे. यावर्षी अभाविप ही स्थापनेची अमृत महोत्सव साजरी करत आहे. त्याच्या औचींत्यवर नगरातील गुणवंत विद्यार्थी ह्यांचा सत्कार व नगराची कार्यकारीणी घोषणा आज दिनांक ७ जुलै रोजी वरोरा येथील आलिशान लॉन येथे पार पडली. ह्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषद सदस्य आ. रामदास आंबटकर साहेब, प्रमुख वक्ता म्हणून अभाविप विदर्भ प्रांत सहमंत्री सुश्री. आर्या पाचखेडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून अधिसभा सदस्य डॉ. सागर वझे व वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष मा. अहेतेशाम अली, युवा सामाजिक कार्येकर्ते शुभम चांभारे उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात १० वी व १२ वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ७० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे पाच खेळाडूंचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सोबतच विकासार्थ विद्यार्थी द्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विद्यार्थ्याना सुद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात अभाविप चंद्रपूर जिल्हा संयोजक श्री. शैलेश दिंडेवार ह्यांनी नगराची कार्यकारीणी घोषणा केली. ह्यामध्ये नवनिर्वाचीत नगर अध्यक्ष म्हणून श्रीमती प्रणाली बेदरकर तर उपाध्यक्ष म्हणून  सुरेंद्र उरकांडे ह्यांची घोषणा करण्यात आली. त्याच प्रमाणे वरोरा नगर मंत्री म्हणून कू. मोनिका टिपले हिची घोषणा ह्या वेळी करण्यात आली. तसेच नगर सह मंत्री म्हणून कुणाल आष्टुकर व कुणाल भट, कार्यालय प्रमुख म्हणून सोनाक्षी हरबडे तर सोशल मिडिया प्रमुख म्हणून संकेत देरकर अशी एकूण ५२ विद्यार्थी व प्राध्यापक कार्यकर्त्यांची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल दातारकर व गीत प्रणाली निखाडे हिने केले. मान्यवरांचे परिचय नंदिनी पोटे तर मंत्री प्रतिवेदन लोकेश रुयारकर ह्यानी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. मोनिका टिपले हिनी केले . कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक वृंद, नगरातील पुर्व कार्यकर्ता व हितचिंतक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Post a Comment

0 Comments