भारत विद्यालय चारगांव (खुर्द) येथे पालक-शिक्षक मेळावा संपन्न.

भारत विद्यालय चारगांव (खुर्द) येथे पालक-शिक्षक मेळावा संपन्न.



वरोरा(प्रती)

भारत शिक्षण संस्था वरोरा द्वारा संचालीत भारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चारगांव( खुर्द) येथे दि. ४ ऑगष्ट २०२३ रोज शनिवारला सकाळी ९:०० वा पालक शिक्षक मेळावा संपन्न झाला: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रितमदास सोनारकर तर प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष -राजू गोडघाटे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीपभाऊ बोधाने होते.ज्यानी पन्नास विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारले ते वसतिगृहाचे अधिक्षक श्री. सुभाष एकरे तर  नवनियुक्त शालेय मुख्यमंत्री कू.नंदिनी किशोर बदकी तसेच पालक शिक्षक संघाचे सचिव श्री. अनिल गजभे सर विचारमंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सेवकराम आनंदे सर यांनी केले. त्यांनी पालक शिक्षक मेळावा घेण्याची आवश्यकता का याची सविस्तर माहिती दिली. शिक्षक मनोगत श्री अनिल गजभे सर यांनी केले. श्री गजभे सरांनी शाळेत घेतल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमाची, स्पर्धा परीक्षांची तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनाची माहिती दिली. त्यानंतर काही पालकांनी आपल्या विद्यार्थ्याप्रती समस्या मांडल्या तसेच आम्हा शिक्षकांना आपल्या मनोगनातून सूचना केल्या. त्यानंतर विचारमंचावर उपस्थित मान्यवरांनीआपली मनोगते व्यक्त केली.

अध्यक्षिय मनोगतात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोनारकर सर यांनी पालकांनी केलेल्या सर्व समस्याचे व सूचनांचे

सविस्तरपणे पालन केले जाईल तसेच विद्यार्थाचा सर्वांगीण विकास

होण्यासाठी आवश्यक त्या बाबीकडे लक्ष पुरविले जाईल असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच पालकांनीही आम्हा शिक्षकांना सहकार्य करावे व वेळ मिळल्यास शाळेला अधून मधून भेट द्यावी असे सूचविले .या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विलास पारेलवार सर यांनी तर आभारप्रदर्शन कु· विद्या नंदागवळी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच जवळपास ३०-४० पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments