रविकमल कॉटेक्स येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

पांढरं सोनं बाजारात

रविकमल कॉटेक्स  येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल- संदेश चोरडिया






वरोरा (प्रती ) विदर्भात ओळखल्या जाणार पांढरं सोनं म्हणजेच कापूस वरोरा तालुक्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली असून  कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी  आपला माल  विक्रीला काढला आहे .
 दि.३/११/२०२३ रोजी रविकमल कोटेक्स मारडा ,वरोरा येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला .  शुभारंभाच्या मुहूर्तावरच ७२५४रूपये या सीजनचा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव  कापूस उत्पादन शेतकऱ्यांना मिळाला .
कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती,जयंत टेंमूर्डे संचालक, गणेश चवले, अभिजीत पावडे ,बाळू भोयर दत्ताभाऊ बोरेकर ,विलास झीले रविकमल कॉटेक्सचे मालक संदेश चोरडिया,कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सचिन डहाळकर किशोर महाजन, कैलास बनसोड पंकज डवरे हे उपस्थित होते, पाहुण्यांच्या हस्ते अरुण खोडे वरोरा ,सुनील गायकवाड आष्टी, अमोल  दातारकर शेगाव ,अरविंद आसुटकर पिरली ,राहुल दातारकर वाघेडा  पहिल्यांदा आलेल्या या कापूस उत्पादक शेतकऱ्याचे स्वागत करण्यात आले


कापूस उत्पादक शेतकऱ्यांना   योग्य भाव मिळेल -संदेश चोरडिया
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची किंवा कास्तकारांची कुठल्याही प्रकारची फसवणूक न होता त्यांच्या मालाला योग्य भाव देण्यात येईल असे मत रविकमल कॉटेक्सचे मालक संदेश चोरडिया यांनी व्यक्त केले असून मागील आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये देशात ३ कोटी २५ लाख कापसाच्या गाठीचे उत्पन्न झाले होते यावर्षी देशात कापसाचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असून त्यामुळे कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा संदेश चोरडिया यांनी व्यक्त केली

Post a Comment

0 Comments