शिव शंकरांच्या मूर्तीची विटंबना ; आरोपी निघाला मनोरुग्ण ?


शिव शंकरांच्या मूर्तीची विटंबना


आरोपी निघाला मनोरुग्ण ?



वरोरा (प्रती)दि.13/11/2023 रोजी मारवाडी स्मशान भूमी बोर्डा येथील मंदिरातील शिव शंकराची मूर्तीची विटंबना झाल्याबाबत पोलीस स्टेशनला फिर्यादीने तक्रार दिल्यावरून अप क्र. 907/23 कलम 295 भादंवीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता 
सदर घटनेमुळे परिसरातील विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे व आंदोलनाचा पवित्रा घेत असताना 
  प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरोरा पोलिसांनी तत्परतेने व मानवी बुद्धिमत्तेच्या आधारे गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आज  दि. 17/11/2023 रोजी  गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे प्रथमेश रावजी कांबळे वय 19 वर्षे राहणार राजेंद्र प्रसाद वॉर्ड वरोरा यास ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास ताब्यात घेऊन  विटंबना झालेल्या मूर्तीचा भाग हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला. तसेच  सदर आरोपी हा मनोरुग्ण असल्याचा पूर्व ईतिहास असल्याने आरोपीला वैद्यकिय तपासणी करीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राखणे करीता जनतेला पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
 सदरची कारवाई मा. आयुष नोपानी भापोसे उपविभाग वरोरा , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे पो. स्टे . वरोरा यांचे मार्गदर्शनात सपोनी पंकज बोंडसे, पोउपनी दिपक ठाकरे , पोहवा किशोर बोढे, दिलीप सुर , दिपक दुधे, नापोशी अमोल धंदरे, पोशी दिनेश मेश्राम , सूरज मेश्राम , फुलचंद लोधी , संदीप मुळे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments