ग्रामीण विकास कामाकरिता १ कोटी व तांडा वस्ती विकास कामाकरिता २ कोटी निधी मंजूर

ग्रामीण विकास कामाकरिता १ कोटी व तांडा वस्ती विकास कामाकरिता २ कोटी निधी मंजूर


 विधानसभा प्रमुख इंजि. रमेश राजूरकर यांच्या प्रयत्नाला यश







 वरोरा(प्रती)
वरोरा व भद्रावती विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण विकास करणे हा एकमेव ध्येय मनाशी बाळगून राजकारण करणारे, दूरदर्शी दृष्ठीक्षेप ठेवणारे, पहिले समाजकारण व नंतर राजकारण या भाजपाच्या ध्येय धोरणाला जपणारे इंजि. रमेश राजूरकर विधानसभा प्रमुख, यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त होऊन वरोरा व भद्रावती विधानसभा अंतर्गत ग्रामीण विकास कामाकरिता १ कोटी निधीची शासनातर्फे विकास कामे मंजूर करुन घेतलेली आहे.
कोणत्याही राजकीय वारसा नसतांना व प्रशासकीय कामाची पार्श्वभूमी असल्याने कामाचा सतत पाठपुरावा करून शासनाकडून ग्रामीण विकास कामाकरिता १ कोटी व तांडा वस्ती विकास कामाकरिता २ कोटीपर्यंतचा भरघोस निधी उपलब्ध करून घेतला व विकास कामाचा नवीन पर्वास सुरुवात केली, त्यांच्या या प्रयत्नामुळे आता वरोरा तालुक्या अंतर्गत मौजा नागरी, मौजा आब वडगाव, मौजा बोर्ड, मौजा दहेगाव व मौजा भटाळा येथे सिमेंट रोडचे बांधकाम तसेच मौजा सालोरी येथे रस्त्याचे डांबरीकरण आणि भद्रावती तालुक्या अंतर्गत मौजा पानवडाळा व डोंगरगाव (खडी) येथील सिमेंट रोडचे व नाली बांधकाम असे महत्त्वाचे काम यामध्ये मंजूर करण्यात आले आहे. तसेच वरोरा भद्रावती विधानसभा अंतर्गत येणाऱ्या तांडा वस्तीकरिता २ कोटी पर्यंतचा भरघोस निधी सुद्धा शासनामार्फत मंजूर करून घेतलेला आहे.

Post a Comment

0 Comments