जेष्ठ लेखिका,कवयित्री शोभा वेले यांना आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार

जेष्ठ लेखिका,कवयित्री शोभा वेले यांना आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार 

नेपाळचे उपराष्ट्रपती प्रेमानंद झा यांनी केले सन्मानित 



चंद्रपूर (प्रती) पुष्परत्न साहित्य समुह नाशिक, गांधी पीस फाउंडेशन नेपाल आणि इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा २६डिसेंबर रोजी काठमांडू नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठामध्ये पार पडला, यामध्ये नागपुर येथिल लेखिका, जेष्ठ कवयित्री शोभा वेले यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात  नेपाळचे उपराष्ट्रपती प्रेमानंद झा, गांधी पीस फाउंडेशन नेपालचे अध्यक्ष लाल बहादूर राणा, विश्व फेडरेशन नेपाळचे संस्थापक लामा ध्यानचो रिनपोचे, चंद्रकुमार शर्मा,इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन रिसर्च सेंटर बी.एन.खरात, पुष्परत्न साहित्य समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रा.आनंद अहिरे सर नाशिक आदी मान्यवरांच्या हस्ते नागपूर येथील कवयित्री, लेखिका शोभा वेले, नागपूर यांना  त्यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार प्रदान करण्यात आला.  कार्यक्रमाला भारत आणि नेपाळ देशाचे एकुण ८० साहित्यिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डाॅ.आनंद अहिरे यांनी आणि संचालन मनिषा कापुरे, नाशिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments