सिकलसेल आजाराबाबत डॉ. दीप्ती जैन यांचे १२ला आनंदवनात मार्गदर्शन

सिकलसेल आजाराबाबत डॉ. दीप्ती जैन यांचे १२ला आनंदवनात मार्गदर्शन



वरोरा (प्रती)

वरोरा स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेद्वारे वरोरा तालुक्यात सिकलसेल या आनुवांशिक आजाराबाबत जनजागृतीतपासणी व उपाययोजनेचे काम हाती घेण्यात आले असून या आजाराच्या अचूक मार्गदर्शनासाठी भारत सरकारच्या सिकलसेल टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. दिप्ती जैन यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
                 12 जानेवारी शुक्रवारला सकाळी 11 वाजता आनंदवनच्या मुख्यमंत्री सभागृहामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निशुल्क कार्यक्रमास वरोरा तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
              सिकलसेल आजाराबाबत नॅशनल हेल्थ मिशन व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था वरोरा, सिकलसेल आजाराच्या शोधतपासणीच्या उद्देशाने महिन्याभरात तालुक्यातील जवळपास 5000 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली आहे. 1 ते 40 वयोगटातील वरोरा तालुक्यातील सर्व नागरिकांची रक्त तपासणी करण्याचे उद्दिष्ट असुन लोकसहभागातून सिकलसेल आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था करणार आहे.

Post a Comment

0 Comments