अहेतेशाम अली यांनी शाळकरी विद्यार्थीनी सोबत साजरी केली सावित्रीबाई फुले जयंती

अहेतेशाम अली यांनी शाळकरी विद्यार्थीनी सोबत साजरी केली  सावित्रीबाई फुले जयंती          



     वरोरा (प्रती )     थोर समाजसुधारक, शिक्षणसेविका महिला हक्कांच्या अग्रणी, कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिनी निमीत्य वरोरा येथील ज्योतिबा फुले चौक,येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सर्वांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.ज्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली अशा शिक्षणसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती शाळेतील विद्यार्थीनी सोबत घेऊन अहतेशाम अली यांनी साजरी केली.या प्रसंगी जय ज्योती,जय क्रांती म्हणत सर्वांनी जयघोष केला. यावेळी नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात अहेतेशाम अली - अल्पसंख्याक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष भाजप तथा माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा यांचा सोबत राजुभाऊ डोंगरे, विठलभाऊ बोबडे,प्रकाशराव बनकर,विलास सपाटे, गोपळभाऊ निंबाळकर,संतोष गोठफोडे, पुजरांमजी डोंगरे, पिंपडशेंडे सर,केशवराव लोते, प्रमोद डोंगरे,रमेश लांजेवार,महेश भिवदरे,दशरथ शेंडे,अमित माडवगडे,प्रशांत भिवदरे,शेखर इंगळे,सुभाष राऊत,संजय नरोले,विनोद ढाकुलकर,गणेश लांजेकर,विलास दरापुरकर,समाज बांधव,शाळेतील विद्यार्थिनी आणि इतर नागरीक या प्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments