कल्पतरू सोशल क्लबतर्फे उद्यापासून वरोऱ्यात 'फन फेस्ट'चे आयोजन

कल्पतरू सोशल क्लबतर्फे उद्यापासून वरोऱ्यात 'फन फेस्ट'चे आयोजन

वरोरा वासियांसाठी मेजवानी ठरणार


वरोरा(प्रती)वरोरा येथील कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने दि.२ फेब्रुवारीपासून फन फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांसाठी एक प्रकारे आनंददायी ठरणाऱ्या या उत्सवाचे उ‌द्घाटन आनंदवन येथील मूकबधीर विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणावर २ ते ७ फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी दिल्ली येथील प्रसिद्ध १० फुट उंचीचे 'बाहुबली हनुमानजी' यांची ढोलताशांच्या गजरात व संगीताच्या तालात भव्य मिरवणूक दुपारी ३ वाजता गांधी चौक ते आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात येणार आहे. सदर उत्सवादरम्यान रोज प्रसिद्ध गायकांच्या गाण्यांची मेजवानी व लावणी नृत्य आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जाणार आहे. विविध नामांकित चारचाकी दुचाकी वाहन कंपन्यांचे आणि अनेक व्यावसायिक या उत्सवात राहतील.  मुलांच्या मनोरंजनासाठी टोराटोरा ड्रॅगन, चांदतारा, गगनचुंबी अशा अनेक प्रकारची व्यवस्था करण्यातआली आहे. उ‌द्घाटन २ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता येथील मूकबधीर विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार आहे. फन फस्टचे आयोजनाचे हे तिसरे वर्ष असुन यावर्षी हा उत्सव १ लाख पन्नास  हजार वर्ग फुटामध्ये   आयोजित केलेला आहे. सदर फन फेस्टकरिता वर्ग १ ते ४थी च्या  विद्यार्थ्यांना मोफत पास वितरित करण्यात आले आहेत या  उत्सवादरम्यान शहरातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. नागरिकांनी उत्सवाचा लाभ  घ्यावा, असे आवाहन कल्पतरू  सोशल क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.  पत्रकार परिषदेला राजू महाजन,चेतन शर्मा (अध्यक्ष), शशी चौधरी, हुजेपा अली, दर्शन मालू, परीक्षित एकरे,  रवी नरोले, तरुण वैद्य, निकेश संचेती, नीरज चौधरी, प्रणय मालू, दर्शन मालू, यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments