भारत विद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा

 भारत विद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा 

 


 वरोरा (प्रती )भारत शिक्षण संस्था वरोरा द्वारा संचालित भारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चारगाव खुर्द जि. चंद्रपूर  येथे दि.1मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      याप्रसंगी भारत शिक्षण संस्थेचे सदस्य आदरणीय श्यामबाबू लोया यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री .सोनारकर सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. राजूभाऊ गोडघाटे,चारगाव खुर्द चे पोलीस पाटील श्री.मंगेश पालथे तसेच विद्यालयातील सर्व अध्यापक अध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोनारकर सर यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारत शिक्षण संस्थेचे सदस्य श्याम बाबू लोया यांनीही याप्रसंगी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. 
     कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .आनंद सर यांनी केले आणि शेवटी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत "जय जय महाराष्ट्र माझा "गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.तसेच सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
           ,

Post a Comment

0 Comments