दुचाकी स्वाराला वाचविण्यासाठी अनियंत्रित झालेल्या कारचा अपघात





चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव फाट्यालगतची घटना
३जखमीपैकी १महिला गंभीर जखमी
वरोरा(प्रती)एका दुचाकी चालकाला वाचविण्यासाठी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली असता कारमधील तीन जण जखमी झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली सदर घटना चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव फाट्याजवळ आज दि.२३/०२/२०२२रोजी स.११वाजल्याच्या सुमारास घडली. जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,
सुनिल गोवादीपे (४३)रा .खैरगाव निशा कोरडे(३५)रा .मारेगावआणि प्रियंका तोडासे(२०)रा. खैरगाव जिल्हा यवतमाळ ,हे आपल्या  कारने (शिफ्ट व्ही डी आय mh40ar8505)खाजगी कामानिमित्त नागपूरला जात असताना या महामार्गावरील पिंपळगाव फाट्याजवळ एक दुचाकीस्वार कारच्या अचानक समोर आल्याने त्याला वाचविण्यासाठी कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले असता कार डिव्हाडरला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेली आणि नागपूर वरून येत असलेल्या कंटेनरच्या समोर आल्याने कारला धडक दिली असता कार पलटी झाली, यामुळे कारमधील तिघे जखमी झाले, सदर माहिती वरोरा टाईम्सला बोलतांना एका जखमींने दिली ,हा विचित्र अपघात झाला असून या मध्ये तीन वाहने अपघातग्रस्त झालीत तसेच कंटेनरच्या मागून येत असलेल्या DNR ट्रॅव्हल्स चालकाने  समयसुचकता दाखवत  गाडीचे ब्रेक दाबले असता गाडी रस्त्याच्या खाली उतरवली त्यामुळे  मोठा अनर्थ टळला .पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत,

Post a Comment

0 Comments