छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा- डॉ. अंकुश आगलावे

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा- डॉ. अंकुश आगलावे
वरोरा(प्रती) भारतीय ग्रामीण विद्यालय कुसना तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त डॉ. अंकुश आगलावे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की महाराजांचे कार्याची व्याप्ती मोठी असून प्रत्येक युवकांनी छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे.
डॉ. अंकुश आगलावे पुढे म्हणाले की छ.शिवाजी महाराजांनी शेतसारा पध्दत लावून शेतक-यांचे उत्पन्न वाढविले तसेच महाराजांच्या काळातही शौचालयाचे बांधकाम रायगड किल्लावर झाले यातून गावांतील बांधवानी काही बोध घ्यायला पाहिजे व हागनदारी मुक्त गांव केले पाहिजे. तसेच या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कुसना गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पालखी व प्रभातफेरी  काढण्यात आली.
या कार्यक्रमांत सत्संग मंडळ अध्यक्ष सुदाम ठस्कर, आकाश वानखेडे, सचिन भोयर मनसे चंद्रपूर, पोलीस पाटील बन्सोड मॅडम, सरपंच सुचिताताई ताजने, पं.स. सदस्य भद्रावती आशाताई ताजने, प्रफुल्ल ताजने, प्रविन सुर, उपसरपंच मनोज तिखट, रमेश राजुरकर, बबनराव बदकी, गणपतराव महातळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल छाबडे, माजी सरपंच मंगाम मॅडम,प्रा.काळे मॅडम, भारतीय ग्रामीण विद्यालयचे लेझिम पथक, प्राध्यापक व प्राध्यापिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments