माता रमाई जयंती निमित्त आंबेडकरी चळवळीतील गायक हेमंत शेंडे यांच्या जागर समतेच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माता रमाई जयंती निमित्त आंबेडकरी चळवळीतील गायक हेमंत शेंडे यांच्या जागर समतेच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद




बल्लारपूर(प्रति) माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने बल्लारपूर येथे घेण्यात आलेल्या एका कार्येक्रमातआंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध निवेदक ,गायक हेमंत शेंडे प्रस्तुत जागर समतेचा या प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मातोश्री रमाई विचार संवर्धन समिती बल्लारपूर द्वारा आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई जयंती उत्सव समितीच्या वतीने दि.६/०२/२०२२ते७/०२/२०२२ रोजी स्थळ- अवित्तम बौद्ध मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई सभागृह  विद्यालय नगर वॉर्ड बल्लारपूर येथे दोन दिवशीय भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.६/०२/२०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये मुला-मुलींसाठी सावित्रीबाई व रमाई च्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली .तसेच स्पर्धात्मक विविध कार्यक्रम घेऊन लहान मुला- मुलींना बक्षिसे देण्यात आली दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७/०२/२०२२ रोजी सकाळी १० वा. भोजनदान व लगेच परित्राण पाठाचे भन्ते आर्यसुत्त भन्ते आनंद भिक्षुणी शीलरक्षिता यांच्या उपस्थितीत  पठण करण्यात आले दु,.१वा. भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी ५ वा. मान्यवरांनी तसेच महिला मंडळांनी आपले मनोगत व्यक्त केले सायं.६वा  हेमंत शेंडे आणि संच प्रस्तुत जागर समतेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  गायक हेमंत शेंडे यांच्यासह अजय कवाडे, मनीषा रणमाळे सिंथेसायझर वादक संघपाल मुंढे  ऑक्टोपॅड वादक संदीप मंडल तबला वादक सतीश कौरासे तसेच साऊंड ऑपरेटर मयूर गावंडे सहाय्यक विकास कांबळे यांचा सहभाग होता या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रेखा देशकर, सचिव रसिका जीवने ,सहसचिव सुनिता वाघमारे / कविता बेताल उपाध्यक्ष विना घुसे कोषाध्यक्ष रमाबाई गायकवाड सदस्य कुसुम बाई वानखेडे, मायाबाई भागवत, संघमित्रा रंगारी ,सावित्रीबाई शेंडे विद्या तोडे ,पारूल भरने करुणा भगत ,जयश्री बेताल ,रवीशा ब्राह्मणे, लता कवाडे, सारिका खैरे प्राची झांमरे, वंदना झाडे ,पूर्णिमा तामगाडगे ,वनिता नगराळे, कमल निखाडे यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्येक्रमाला महिलांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन विद्या तोडे प्रास्ताविक रसिका जीवने आणि आभार लता कवाडे यांनी व्यक्त केले,

Post a Comment

0 Comments