ग्रामगीता सर्वधर्माचे सार - डॉ. अंकुश आगलावे




        वरोरा:-  कंेद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी  जळका येथील प्रार्थना मंदीरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संगमवरी मुर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळया वेळी ग्रामगीता ही सर्वधर्माचे सार असल्याचे मत व्यक्त केले. सदर्हू मुर्तीची स्थापना देवाजी श्रीहरी सोनटक्के यांचे स्मृती प्रित्यर्थ करण्यात आली. या मुर्तीची स्थापना करण्याचे आश्वासन डॉ. अंकुश आगलावे यांनी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या पुण्यतिथी सोहळया दरम्यान घोषणा करून आश्वसनाची पुर्तता केली.
           प्राणप्रतिष्ठान सोहळयात डॉ. आगलावे म्हणाले की, ग्रामगीतेमध्ये  सर्व धर्माचे सार असून यात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्द, बिरसा मुंडा, गाडगे महाराज यांचे विचार आहे. संताने आपल्या भजन, किर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती करण्याचा मोलाचा संदेश दिला. महाराष्ट्रातील युवा पिढींनी राष्ट्रसंताचे विचार आत्मसात करून ग्रामगीता वाचुन समजावून घेतली पाहीजे.
               प्राणप्रतिष्ठा व अनावरण सोहळयास गुरूदेवसेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीराम फुलझेले, ग्रामगीताचार्य रूपलाल कावळे, रवीदादा मानव अध्यक्ष गुरूकुल अध्यात्म मोझरी, हरिभक्तपारायण किर्तनकार ठाकरे महाराज ,दादा उरकुटे, इटनकरजी, ज्ञानेश्वर दादा, नरेंद्र जीवतोडे, सुरज पेंदाम नारायण वराडकर,, रूपेश वांढरे आदींची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments