मातंग समाज अन्याय निवारण समिती व लहुजी ब्रिगेडच्या वतीने जिवती तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा



जिवती (प्रती)- दि 17/2/22 रोजी ता .जिवती जि चंद्रपूर येथे *मातंग समाज अन्याय निवारण समिती * व *लहुजी ब्रिगेड * च्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .समितीचे राज्यसमन्वयक डॉ अंकुश गोतावळे यांच्या मार्गदर्शनात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .मोर्चाचे नेतृत्व प्रा .सुग्रीव गोतावळे (मा .उपसभापती पं स जिवती ),श्री देविदास कांबळे ,श्री भानुदास जाधव ,श्री व्यंकटी तोगरे ,श्री आनंद पवार ,श्री .आनंद हरगीले श्री माधव तोगरे ,श्री पांढरी वाघमारे यांनी केले .तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते .तर तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते .मोर्चाची सुरुवात बसस्थानक येथून करण्यात आली आणि मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहचल्यानंतर तेथे सभा घेण्यात आली .निषेध सभेला अनेक मान्यवरांनी संबोधित केले .
   स्व .डॉ हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हि प्रमुख मागणी होती .तर तेलंगणा चे मुख्यामंत्री के .चंद्रशेखर राव यांनी संविधान निकामी झाले असून आता नव्याने लिहिणे सुरु आहे आणि ते लवकरच लागू होईल असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला .
त्यानंतर मागण्यांचे निवेदन मा तहसीलदार यांना समितीच्या शिस्टमंडळाने दिले आणि मोर्चाची सांगता करण्यात आली .

Post a Comment

0 Comments