मूर्तीची विटंबना करणारा अटकेत


वरोरा(प्रती)यात्रा वॉर्डातील भाजी मार्केटमधील भगवान शंकराजी च्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला काही तासातच वरोरा पोलिसांनी अटक केली.
सदरची घटना दि.१६/०२/२०२२रोजी ७;३०च्या दरम्यान घडली होती
गेल्या ३०वर्षा पूर्वी भाजी मार्केट परिसरात मूर्तीची स्थापना करण्यात आली होती, या मूर्तीला सभोवताल लोखंडी कठडे आहेत, यात प्रवेश करून मूर्तीला दगड मारून तोडल्याने विटंबना करण्यात आली होती, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस विभागाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती आणि शांतता राखण्याचे आव्हान केले होते, आणि दुसरीकडे पोलिसांची चार पथके  आरोपीच्या शोधात होती काही तासातच पोलिसांनी मूर्तीची  विटंबना करणाराआरोपी इसलाख  मुस्ताक शेख वय३५वर्ष रा, कॉलरी वॉर्ड वरोरा याला जेरबंद केले आणि न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली,,,

Post a Comment

0 Comments