अखेर नियतीने आदित्याला हिरावले

...अखेर नियतीने  आदित्याला हिरावले
वरोरा(प्रती) शहरालगत असलेल्या बोर्डा येथील  येटे यांच्या मुलगा पतंग उडवीत असतांना उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने अपघात होऊन  भाजल्या गेल्याने  आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला  .
दि.२८/०१/२०२२रोजी  उमेश येटे रा. बोर्डा यांचा मुलगा आदित्य हा पतंग उडवीत असतांना २२०के .व्ही विद्युत तारांना रीळचा स्पर्श होऊन स्फोट झाल्यामुळे तो ८५ते९०टक्के जळाला होता तेव्हापासून मिन्स हॉस्पिटल नागपूर येथे त्याच्यावर उपचार सुरू होता, तो जीवन जगण्यासाठी संघर्ष करीत असतांना अखेर दुःखद घटना घडली आज दि,.२०/०२/२२रोजी पहाटेच्या सुमारास  आदित्याला नियतीने हिरावले,दुःखद निधन झाले. उमेश येटे यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी अनेक सामाजिक संस्था,लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, वैयक्तीकरित्या  आर्थिक मदत केली होती.परंतु आदित्याची मृत्यूशी झुंज अखेर व्यर्थ ठरली .यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,

Post a Comment

0 Comments