आरोग्य हीच खरी धनसंपत्ती - डॉ. अंकुश आगलावे

आरोग्य हीच खरी धनसंपत्ती - डॉ. अंकुश आगलावे


            माजरी(प्रती):- युवाशक्ती शाखा माजरी च्या वतीने 14 फेब्रुवारी ला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात शहीद सैनिकांना  श्रध्दांजली अर्पन करण्यात आली.
        सदर्हु रक्तदान शिबीरात डॉ. आगलावे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना म्हटलेे की आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे याची आपल्या सर्वाना जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पुढे म्हणाले की  देशाला स्वातंत्र तेव्हाच मिळेल जेव्हा आतंक व दशहतवादी विचारणीचा समाजातून संपूर्ण नायनाट होईल त्याकरीता समाजातील प्रत्येक नागरिकांनी एकजुट होणे गरजेचे आहे.
             देशाला स्वातंत्र मिळवून देण्यास संताची भुमिका महत्वाची होती, भजन व किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती संतानी केलीच इतकेच नव्हेतर तर भारत देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिकांचे मनोबल वाढविण्याचे कार्यसुध्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी चीनच्या सीमेवर जावून केले. .
या कार्यक्रमात डॉ.हजारे बीटीओ, प्रसाद शेटे, मेडिकल सोशल वर्कर, जय पचारे संतोष दासरवार, अमोल तरारे चैतन वैरागडे, रूपेश घुमे , आकाश वानखेडे सामाजीक कार्यकर्ता, यांनी शिबीर चमुचे नेतृत्व केले.
            युवाशक्ती माजरी शाखाचे परमुख गणेश खरवार, रोहीत तालावार, अमित चौधरी, संपत अन्ना, विष्णु पेसारी, सेवडैया, छोटक प्रसाद, रंजीत मातंगी. यांनी रक्तदान शिबीर कार्यकर्माचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले.

Post a Comment

0 Comments