खडकी परिसरात आदर्श शिवजयंती साजरी

खडकी परिसरात आदर्श शिवजयंती साजरी 



अकोला (प्रती)स्थानिक खडकी बु, जिल्हा परिषद नगर ,,श्रद्धा कॉलनी ,संतोष नगर , महसूल कॉलनी, साई नगर, म्हाडा कॉलनी, अष्टविनायक नगर, आदी संपूर्ण परिसरात  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सगळ्या पक्षाचे स्थानिक नेते सर्व जातीधर्माचे सर्व स्थानिक नेते. कार्यकर्ते त्या शिवजयंतीच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन सर्व ठिकाणी एकत्र व्यासपीठावर येऊन सर्वांनी मिळून या परिसरातील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सर्व जाती धर्माचे पक्षाचे नेते कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते एवढेच नव्हे तर आजी-माजी एकमेकाच्या विरोधात उभे राहणारे भावी नगरसेवक सुद्धा या रॅलीमध्ये सर्व पक्षाचे उपस्थित राहून  आगळा वेगळा आदर्श खडकीच्या शिवजयंतीने घडविला आहे  .या शिवजयंतीने व सर्वांनी जिल्ह्यासाठी आदर्श निर्माण केला. कोणत्याही प्रकारचे नाच गाणे, गुलाल उडवणे नाही शांततेने,उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करण्यात आली विशेष म्हणजे या सर्व परिसरातील स्थानिक तरुण युवकांनी या शिवजयंती चे आयोजन नियोजन केल .या शिवजयंती उत्सवत सर्व जाती धर्माचे पंथाचे सर्व पक्षाचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यामध्ये नगरसेवक मंगेश काळे, शंकर लंगोटे, अनिल हरणे, मुकेश मुरूमकार ,वैकुंठा ढोरे, आशिष गावंडे, संजय भगत, राजेश घोगरे, गणेश अंधारे, अजय शेळके, राहुल इंगोले, , गोटू अगरवाल, राहुल बिरकर, राजेश वगारे, अविनाश मोरे, सिद्धेश्वर शिरसाट, प्रमोद धर्माळे, आशुतोष चव्हाण, प्रवीण हुंडीवाले, सुरज मेंगे, सतीश शेळके, सुधाकर पोळकट , आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून  या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिवजयंती  महोत्सव यशस्वी करण्याकरता तन्मय हरणे, रोशन फाळके ,शंतनु मानकर, अभिषेक मुंडे , ईश्वर पाठक,हर्षल गिरे ,तुषार केने ,यश गीरे, गौरव  शिंदे, शिवंम बेलगे, मयुर इंगळे , गजदीप जळमकर, गुलाब भांगे, आकाश शिरोडकार, राम शिरोडकार ,उमेश लांडगे, उदय कुटे,पप्पू हातोलकर ,रोहित शिंदे , नरेश चव्हाण ,अथर्व घोगरे, गणेश बुजाडे ,गोलू पवार, मंगेश ऑइंबे , अभि सपकाळ, वेदांत बगाडे ,राम पोहरे, पप्पू हतोलकर अक्षय इंगळे, गौरव जानोरकर, निशांत तिवारी, स्वप्नील दळवी, अक्षय तायडे, अक्षय भगेवार, गुडू रायबोले, तुषार सोनोने,धीरज इंगळे,ऋतिक अंधारे,सौरव चीलवंते,वैभव भाबेरे,अजय देशमुख,कुणाल चव्हाण,  मयुर देशमुख, हर्षल शेळके, सागर मिटकरी, परिक्षीत उकरडे, अजय सावंत, आदी शिवभक्तांनी अथक परिश्रम घेतले. शिवजयंती मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाली

Post a Comment

0 Comments