प्रभाग८मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार?



ना.प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक नगर प्रशासनाला दिल्या सूचना
वरोरा(प्रती) वरोरा येथील प्रभाग ८मधील जिजामाता वार्ड ,राजीव गांधी वार्ड ,तसेच सहारा पार्क या भागात न.प ची नळ योजना नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत आहे, आज याबाबत ना. प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री म.रा )यांना राष्ट्रवादी नेत्याच्या नेतृत्वात वॉर्डवासीयांनी  निवेदन दिले असता ना.प्राजक्त तनपुरे यांनी नगर प्रशासनाला सूचना दिल्याचे निवेदनात म्हटले आहे
आज दि.२०/०२/२०२२ रोजी ना.प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरआले असता त्यांनी वरोरा  येथील स्थानिक विश्राम गृहात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली,
गेल्या अनेक वर्षांपासून राजीव गांधी वॉर्ड, जिजामाता वॉर्ड, तसेच बावणे ले आऊट मधील सहारा पार्क या वॉर्डात न .प ची नळ योजना नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे,   घरगुती बोरिंगला उन्हाळ्याच्या दिवसात  पाणीच येत नसल्याने अक्षरशः महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, काही दिवसांपूर्वी वार्ड वासियांनी वरोरा  नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते यामध्ये नगर प्रशासनाकडून दीड महिन्याचा कालावधीत संबंधित समस्यांचे निराकारण करू असे आश्वासन दिले होते, आज ऍड मोरेश्वरजी टेमुर्डे ,माजी उपाध्यक्ष विधानसभा(महा.रा )विलास नेरकर, अध्यक्ष ,वरोरा -भद्रावती निर्वाचन क्षेत्र विधानसभा  तसेच बंडू  डाखरे सर, जिल्हाकार्याध्यक्ष ओबीसी सेल जिल्हा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात वार्डातील मोनाली काकडे, योगेश गहुकार सुषमा पिजदूरकर ,नंदा करमळकर ,योगिता बेतवार , दादाजी चौधरी, प्रभाकर उपरे सुभाष उसेवार सचिन हाते गोविंदा ठेंगणे, सुशीला कोहपरे या शिष्टमंडळाने ना.प्राजक्त तनपुरे यांना याबाबतचे निवेदन दिले,

Post a Comment

0 Comments