अनेक वर्षापासून वंचित असलेल्या त्या वार्डात पिण्याच्या पाण्याची सोय करा *

-
वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांच्या कडे मागणी 
  वरोरा(प्रति) वरोरा नगरपालिका क्षेत्रातील जिजामाता प्रभाग,बावणे लेआऊट मधील गेली 25 ते 30 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वार्डातील जनता खूपच त्रस्त झालेली आहे. वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली नाही दिनांक 14/02/2022 ला सौ मोनाली संतोष काकडे हिने सहारा पार्क च्या ओपन स्पेस मध्ये लोकांना एकत्रित करून मीटिंग घेऊन समस्या जाणून घेण्यात आल्या आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी आज दिनांक 15/02/2022ला वार्डातील लोकांनी एकत्रित येऊन मा.मोरेश्वरराव टेमुर्डे,साहेबांच्या नेतृत्वत आणि विलासराव नेरकर,बंडूजी डाखरे,राजेंद्र वरघणे, बंडूजी भोंगाडे,रंजना पारशिवें,यांच्या सोबत वार्डातील वनमाला कोहपरे,नीता बोधाने, पूनम हाते, मंगला मडावी,नंदा करमरकर,प्रेमीला चौधरी,माधुरी उसेवार सुभाष तोडकर,दादा क्षीरसागर,गोविदराव ठेंगणे,विजय वाटकर,महिला आणि पुरुष यांना घेऊन मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या सोबत बैठक घेऊन वार्डातील संपूर्ण माहिती देऊन सविस्तरपणे चर्चा करून पिण्याच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि मा.गजानन भोयर, मुख्यधिकारी साहेबानी जनतेला शब्द देऊन काही दिवसातच पाईपलाईन टाकण्यात येईल असे आशवस्थ केले आणि वार्डातील लोकांचे त्यांनी समाधान केले

Post a Comment

0 Comments