वरोरा माढेळी नाक्यावर दिशादर्शक व गाव बोर्ड फलकाचे अनावरण*

🛂
*वरोरा माढेळी नाक्यावर दिशादर्शक व गाव बोर्ड  फलकाचे अनावरण*
🚦प्रवीण सुराणा यांच्या प्रयत्नांना यश
🚫इनरव्हिल क्लबचा स्तुत्य उपक्रम
वरोरा(प्रति) वरोरा शहरालगत मार्डा ,एकोना, माढेळी व छोटी-मोठी अनेक गावे शहराच्या अगदी काही अंतरावरच आहेत त्याचप्रमाणे या शहराला लागून तीर्थक्षेत्र,  पर्यटनक्षेत्र  विविध कंपन्या व कोळसा खदान व याच परिसरात काही शाळा असल्याने मार्डा वरोरा ते एकोना वरोरा तसेच माढेळी वरोरा या गावातून 24 तास वाहनांची वर्दळ सुरू असते बाहेरील जिल्ह्यातील मोठ्या वाहनातून याच रस्त्या वरून दळणवळण  केल्या जाते वरोरा शहरात बाहेरुन येणारी काही वाहने  माढेळी नाक्याकडून येत असल्याने नेमक्या कुठल्या रस्त्याने शहरात जायचे किंवा बाहेर जिल्ह्यात जाताना कुठला रस्ता आहे याचे दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांची अक्षरशा कोंडी निर्माण होते तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या वाहक चालकाला कंपनी मध्ये कसे जायचे याचा नाहक त्रास सहन करावा लागतो या समस्येची दखल घेत वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा यांनी इनरव्हील क्लबच्या काही सदस्यांना निवेदन देऊन दिशादर्शक व गाव बोर्ड फलकांची मागणी केली होती इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत आज दि.१६/०२/२०२२ सायंकाळी ४:००वाजता माढेळी नाक्यावर दिशादर्शक व गाव बोर्ड फलकाचे अनावरण केले काही दिवसातच वनी बायपास नागपूर नाका येथे ही सदरचे फलक लावण्यात येईल असे प्रवीण सुराणा यांनी सांगितले वरोरा येथील ऑक्सिजन ब्रिगेड व सच्चे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणारे प्रवीण सुराणा हे सातत्याने शहरात निर्माण होत असलेल्या समस्यांकडे प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचे काम करतात व त्या समस्यां मार्गी लावण्याचे इमाने -इतबारे काम करतात, आज फलकाचे अनावरण करताना अध्यक्ष मधु जाजू सचिव वंदना बोढे माजी आरोग्य सभापती दिपाली टिपले संध्या बारई ,बाहेती ,प्रतिभा मणियार अर्चना ठाकरे, सायरे व इतर सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments