छत्रपती शिवाजी महाराजांची युध्दनिती जगभरात प्रसिध्द - डॉ. अंकुश आगलावे



वरोरा(प्रती) छावा ग्रुप, आनंदवन चौक, वरोरा  तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त डॉ. अंकुश आगलावे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती भारत देशापुरती मर्यादित नसून जगातील अनेक देश त्यांच्या युध्द नितीचा अर्थातच गनिमाकावा चा अवलंब करून शत्रुस जेरीस आणत आहे. त्याबद्दल आपण सर्व भारतीयांना अभिमान वाटलाच  पाहिजे.
छत्रपती शिवाजी राजे यांच्या युध्द नितीचा अवलंब व्हियतनाम ,इसराइल तसेच इतर अनेक देशानी  केला आहे.  महाराजांचा इतिहास  परदेशात सुध्दा शिकविला  जातो. छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा आदर व सन्मान करत होते त्यांच्या काळात अब्रु लुटणाÚयांना मृत्यूदंडाची शिक्षा होती तेव्हा महिला सुरक्षित होत्या असे डॉ. आगलावे यांनी आपल्या भाषणातुन सांगितले.  
कार्यक्रम प्रसंगी गरीब विद्यार्थ्यांना सायकल व बॅग वाटप छावा ग्रृपव्दारे मान्यवारांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी सौ.प्र्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा विधानसभा क्षेत्र, सरपंच खामनकर , राजु चिकटे, आकाश लिंगाडे अध्यक्ष छावा ग्रुप , समीर देठे, राहुल नन्नावारे, सुधाकर गोकंुले ,पदाधिकारी व  अनेक शिवभक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments