युक्रेन मध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना आवाहन


जिल्हाधिकारी  तसेच तहसील कार्यालयाला संपर्क करा
वरोरा(प्रती) रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून यामध्ये विस हजाराहून अधिक भारतीय नागरिक तसेच विद्यार्थी युक्रेन या देशात अडकलेले आहेत, त्यांना सुखरुप आणण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे
सध्यास्थितीत रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युद्ध घोषित केले आहे, या परिस्थितीत युक्रेनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ सदर नागरिकांचे नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालय येथे संपर्क करून कळवावे ,जेणेकरून अडकलेले नागरिकांना सुखरूप पणे परत सुरक्षित ठिकाणी  आणण्याबाबत कार्यवाही करता येईल याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की युक्रेनमध्ये अडकलेले त्यांचे नातेवाईक याबाबत तात्काळ जवळच्या तहसील कार्यालयास कळवावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथील 07172 -25 15 97 किंवा मोबाईल क्रमांक 76 66 64 1447 या  क्रमांकावर संपर्क करून कळवावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर विशाल कुमार मेश्राम यांनी कळविले आहे

Post a Comment

0 Comments