IPS निपोनी साहेबांच्या गैरहजरीत वरोऱ्यात अवैध धंद्यांना पुन्हा उधाण?



⭕अवैध दारू तस्कर उतरले रेतीच्या तस्करीत,,,,!
वरोरा(प्रती) वरोरा- भद्रावती तालुक्यातील मागील काही दिवसापासून अवैध धंदेवाईकांनीआपले चांगलेच डोके वर काढले असून आय .पी .एस निपोणी साहेबांच्या गैरहजरीत अवैध धंद्यांना उधाण आले आहे, स्थानिक पोलिसांचा अंकुश धंदेवाईकावर नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावले आहे, चार  महिन्यापूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष निपोणी(ips) हे रुजू झाले होते. एखाद्या चित्रपटाला साजेल अशी निपोणी यांची एन्ट्री झाली होती, आणि आल्या आल्याच त्यांनी अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू केले असता त्यांच्या या धसक्याने लहान -मोठे धंदेवाईक भुमिगत झाले होते,तर काहींनी आपला जुगाराचा ठिय्या बदलला होता,परंतु गेल्या काही दिवसांपासूनआयुष  निपोणी यांच्या गैरहजरीत पूर्वीचे अवैध दारू तस्कर हे खुले आम रेती तस्करी करतांना दिसत आहेत,महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे,

Post a Comment

0 Comments