समाजसेविका योगिता लांडगे यांना "हिरकणी"पुरस्कार जाहीर

समाजसेविका योगिता लांडगे  यांना "हिरकणी"पुरस्कार जाहीर
 सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
वरोरा(प्रती)जागतिक महिला दिनी वरोरा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या योगिता लांडगे यांची "हिरकणी"पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 
 विकासात्मक कामे, महिला व बालकांच्या क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे तसेच त्यांनी महिला व बाल साहाय्य कक्षा मार्फत अनेक महिला व बालकांना भरघोस मदत केली आहे, यासाठी त्यांना सर्व परिचित बंडू डाखरे सर, वंदना डाखरे, डॉ निशा वैद्य, पत्रकार मित्र यांनी सदैव सहाय्य केले आहे तसेच,जलसाक्षरता,मृदसंधारण,  किशोरिंचे आरोग्य शिबिरे,अशा अनेक सामाजिक कार्ये हाती घेऊन समर्पित भावनेने त्या काम करित. आहे. त्यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन
 डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी त्यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२देण्याचे निश्चित झाले आज संपूर्ण महाराष्ट्रातील ज्ञानवंत, प्रज्ञावंत, कर्तृत्ववान महिलांची अत्यंत सन्मानाचा "हिरकणी पुरस्कार २०२२करिता निवड करण्यात आली. 
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी प्रती वर्षी क्रिडा ,शिक्षण,समाजकारण,संशोधन,अर्थकारण,राजकारण,प्रशासकीय सेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान करून सन्मान केला जातो.आज सदरील राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२ साठी राज्यभरातून  प्राप्त झालेल्या प्रस्तावातून  आपल्या  कार्याने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या हिरकणी ची निवड घोषित करण्यात आली यात डाँ.आर्चना भोसले ,जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा शासकीय रुग्णालय ,जालना, कु.श्रुतिका जयकांत सरोदे रोलर स्केटींग,पुणे ,सौ.सारिका अंबादास रोकडे ,परभणी,सौ सविता प्रभाकरराव पराड पाटील संस्थापक अध्यक्ष, गोदावरी मल्टीस्टेट को आँप क्रेडिट सोसायटी लि गेवराई जि बीड, डाँ.मालिनी मोहन वडतकर, वर्धा, श्रीमती भावना हेमंत पाटील पद शिक्षणविस्तार अधिकारी जिल्हा परिषद  माध्यमिक विभाग  धुळे, कु.अंकिता एकनाथ  बाविस्कर [ पाटील ] पोलिस उपनिरीक्षक  अक्कलकुवा पोलिस  स्टेशन ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार, डाँ.माधुरी तुकाराम भोसले (फड) ,सोलापूर, शिवमती कुसुम भोयर , गडचिरोली, डाँ.रुपाली सावळे ,अकोला,यवतमाळ न. प. च्या मुख्याधिकारी माधुरीताई मडावी ,यवतमाळ, मंगला नितीन उंडे,नायब तहसिलदार,भातकुली जि.अमरावती डॉ. प्रविणा प्रमोद शहा प्राचार्या, श्री अ.खि. नॅशनल हाय. व ज्यु. कॉलेज, खामगाव जि. बुलडाणा, श्रीमती वंदना प्रभाकर फुटाणे ,शिक्षणाधिकारी, प्राथमिक, लातूर ,जयश्रीताई निलेश पावडे महापौरनांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड, सौ रत्ना तुळशिराम भदाणे ग्रेडेड मुख्याध्यापिका जि.प. प्रा.शाळा शिरूड ता.अमळनेर जि. जळगाव,शिवमती  प्रिया प्रदीप पाठकसामाजिक कार्यकर्ता,शिवमती योगिता जगदीश लांडगे
चंद्रपूर ,वाशिम, सौ.भारती अनिल पाटील शिक्षण ,अर्थ व क्रिडा सभापती जि.प. नागपूर यांचा समावेश आहे. 
सदरील राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२ मिळविणार्या सर्व हिरकणीचे सर्वत्र कौतुक होत असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर  व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  लक्ष्मण नेव्हल, प्रदीप दादा सोळंके ,सुनील चव्हाण ,सतीश काळे ,कैलाश राऊत, प्रा.शेषराव येलेकर ,दयानंद जाधव ,शांताराम जळते ,संजय निंबाळकर,प्रभाकर पराड ,शामराव लवांडे ,लीलाधार पाटील ,डॉ.विलास पाटील, बंडुभाऊ डाखरे , राजेंद्र भोयर ,प्रशांत खाचणे ,अनंत मिटकरी , कृष्ण वाघ , नितीन ठाकरे, सुनिल मनवर, प्रशांत जिन्नेवार, गिताताई बेले, किर्ती काळमेघ, राजकुमार भोयर,नरेंद्र हाडके, आशिष खडसे, राजेंद्र फुन्ने, देवदत्त भोयर, राहूल कोचे, दत्तात्रय गावंडे, मधूकर डहाके, रमेश पवार, ज्योती ढाले,विजय कदम, सादिक पठाण,ईखलाख सर,बाळासाहेब सरसमकर, विजय माने आदिनी अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments