माहितीचा अधिकार अंमलबजावणीसाठी जनतेने जागरूक राहणे गरजेचे - गजानन हरणे

माहितीचा अधिकार अंमलबजावणीसाठी जनतेने जागरूक राहणे गरजेचे - गजानन हरणे


अकोला (प्रती) माहितीच्या अधिकारामुळे जनतेला नाकारत. असलेली माहिती जनतेला मिळत आहे. खासदार, आमदारांना जी माहिती मिळते तीच माहिती या देशातील सामान्य नागरिकाला. मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे कामे मार्गी लागले आहेत. शासनाच्या तिजोरीतील पैसा जनहितासाठी खर्च होतो की नाही हे पाहण्यासाठी रखवालदाराची भूमिका सामान्य नागरिक वठवू लागला हे काही " भ्रष्ट अधिकाऱ्यांना सहन न झाल्यामुळे ते या कायद्याला निष्फळ ठरविण्याठी. याची अंमलबजावणी योग्यरितीने पार पाडत नाहीत. उलट हा कायदा. संपविण्याचा कट भ्रष्ट शासकीय यंत्रणेने चालविला असल्याचे. प्रतिपादन तेल्हारा येथील शिवाजी हायस्कूल मध्ये माहिती अधिकार कार्यशाळेला संबोधित करताना निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक तथा समाजसेवक गजानन हरणे यांनी केले .  छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान , प्रहार संघटना, निर्भय बनो जनआंदोलनच्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त  विविध कायद्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते, तज्ञ मार्गदर्शक म्हणून समाजसेवक गजानन हरणे हे होते .तर प्रमुख उपस्थिती मध्ये राजेश पाटील खारोडे जिल्हा महासचिव प्रहार संघटना, निर्भय बनो जनआंदोलनाचे संघटक राजू पुडकर, बंडू पाटील नेमडे शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख, निलेश नेमाडे सरपंच रायखेड, खालिक शहा सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना गजानन हरणे म्हणाले की, माहितीचा अधिकार हा कायदा ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अडचणीचा वाटू लागला ते अधिकारी चुकीच्या माहिती देणे, विनिर्दिष्ट वेळेत जाणून बुजून माहिती न देणे अर्ज न स्वीकारणे, पोच पावती न देणे सहज माहिती उपलब्ध असून सुध्दा वेळेत न पुरविणे. काही अधिकारी माहिती मागणाऱ्या नागरिकाला जाणून बुजून मानसिक, आर्थिक त्रास देणे, धमकी देणे तसेच आर्थिक आमिष दाखवून सदर माहिती दाबण्याचा प्रयत्न करणे, माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे या माध्यमातून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे. बंधनकारक असूनसुध्दा शासकीय यंत्रणा हे काम जाणूनबुजून टाळत आहेत. दोषी आढळल्यास त्या अधिकारावर निलंबन, बडतर्फसारखी कारवाई होणेसाठी माहितीचा अधिकार या कायद्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन शिवा पाटील खारोडे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण पत्रकार विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळा शांततेच्या वातावरणात पार पडली.   🙏.     माननीय संपादक साहेब,  प्रकाशनर्थ.

Post a Comment

0 Comments