वडिलांच्या हत्येचा ५ वर्षाचा साक्षीदार विशाल म्हणाला,,,, मारा बान मारी आयायेच मारी, जीव लिदी हत्येतील सूत्रधार मोकाटच

वडिलांच्या हत्येचा ५ वर्षाचा साक्षीदार  विशाल म्हणाला,,,,
मारा बान मारी आयायेच मारी, जीव लिदी
हत्येतील सूत्रधार मोकाटच
कोरपना(प्रती) मारा बान मारी आयायेच मारी जीव लिदी(माझ्या वडिलांची हत्या माझ्या आईनेच केली) असे वडिलांच्या हत्येचा साक्षीदार असलेला  ५ वर्षाचा  मृतकाचा मुलगा विशाल याने   वरोरा टाईम्स शी बोलतांना सांगितले ,
16 मार्च ला कोरपना तालुक्यातील मौजा पारधी गुडा येथील रहिवासी रमेश नन्नावरे  (37)यांचा त्यांची पत्नी सुरेखा नन्नावरे हिने गळा आवळून खून केल्याची घटना घडली ,
यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती, परंतु यातील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट असल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत करण्यात आला,
 सुरेखा आणि अश्विन नन्नावरे यांचे अनैतिक संबंध होते , सुरेखा आणि अश्विन हे पळून जाऊन आठ महिने गायब  होते, सुरेखा तब्बल आठ महिने अश्विन सोबत राहिल्यावर ती एका महिन्यापूर्वी गावी परतली होती परंतु गावात येण्यापूर्वी ती विलास राऊत यांच्या शेतातील गोठ्यात काही दिवस राहली होती , असे असून सुद्धा आपल्या मुला बाळाचा विचार करता  रमेशने तिला स्वीकारले होते ,परंतु आतून तो दुखावल्या  गेला होता हत्येच्या एक दिवस अगोदर सुरेखा आणि रमेश त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते ,आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सुरेखाने रमेशची झोपेत असतांना  गळा आवळून हत्या केली आणि ही सर्व घटना त्याचा मुलगा विशाल याने
 खिडकीतून पाहिले ,अश्विन आणि सुरेखा हे पळून जाण्यात आणि सुरेखा पुन्हा घरी रमेश कडे परत येण्यास विशाल राऊत याने मदत केली होती असा आरोप काल एका पत्रकार परिषदेत करण्यात आला तसेच सुरेखा हिचा भाऊ रवींद्र पवार याने सुद्धा सुरेखा ला मदत केली असाही आरोप आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांनी पत्रकार परिषदेत केला ,अश्विन नन्नावरे, विलास राऊत आणि रवींद्र पवार हे हत्येतील सह आरोपी असून त्यांची सखोल चौकशी व्हावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी धर्मेंद्र शेरकुरे आणि पारधी समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केली

Post a Comment

0 Comments