चारित्र्या अभावी अस्थिरतेचे साम्राज्य -गजानन हरणे

 चारित्र्या अभावी अस्थिरतेचे साम्राज्य -गजानन हरणे,


अकोला(प्रती)   आज देशापुढे वान आहे ती राष्ट्रीय चारित्र्याची, त्यांच्या अभावामुळे देशात सर्वत्र अस्थिरतेचे साम्राज्य पसरलेल असल्याचे प्रतिपादन मा.गजानन हरणे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक, निर्भय बनो जनआंदोलन यांनी केले.

देशाचा राज्यकारभार सुरक्षित चालविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणि स्वजन निष्ठेवर नेहमीच भर दिला. भक्कम राज्याच्या उभारणीसाठी राष्ट्रीय चारित्र्यासह या भावनांची अतिशय गरज असल्याचे जाणून असल्यामुळे त्यांनी राज्यकारभार सुयोग्य प्रकारे चालण्यासाठी या बाबींचा उपयोग करुन घेतला. देशहिताच्या भावनेचा पुर्वीचा झरा आताच्या पुढाऱ्यांत नसल्यामुळे चारित्र्य संपन्न आणि जनहिताचा विचार करणाऱ्या नेत्यांची आज देशाला गरज आहे. आज सगळीकडे सर्वधर्म समभाव हा शब्द वारंवार उचारला जातो. परंतु आपण खरोखरच तस वागतोय कां? यासाठी आत्मपरिक्षण करण्याची गरज झाली आहे

छत्रपती शिवाजी महाराजां सारखे धुरंधर राजकारणी जनहितार्थ आपला देह झिजवणारे आणि सर्वांना समान वागणूक देऊन सर्वधर्मीयांचा आदर करणारे ऐतिहासीक व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायीच ठरणारे असे आहे. या  महापुरुषाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आजचे पुढारी वागले तर या देशाचे नक्कीच भले होईल. छत्रपतीचे राजकीय जिवन हा राजकिय पुढाऱ्यांसाठी एक अभ्यासाचा विषयच ठरावा. असे मार्मीक प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी समता नगर, सिंधी कॅप अकोला येथे छत्रपती शिवाजी महाराज व आजचे राजकीय पुढारी, या विषयावर व्याख्यानचे आयोजन युवक क्रांती मंडळचे वतिने शिवजयंती निमित्त करण्यात आले होते .यावेळी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते, मार्गदर्शक   ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे हे उपस्थित होते  . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शेख मो. खान हे होते .संचालन व आभार प्रदर्शन कु. स्नेहा वानखडे हिने केले. परिसरातील असंख्य नागरीक, युवक युवती महिला मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते. चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली.                    

Post a Comment

0 Comments