लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष फकिरा साठे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी--पंडितभाऊ दाभाडे

बहुजन जनता दलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


......................................
पुणे (प्रती) साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष फकिरा रानोजी साठे या दोन्ही महापुरुषांनी दलित-बहुजन आणि उपेक्षितांना न्याय सन्मान मिळावा आणि या समाजाने आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी समाज कार्य केले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि वीरपुरुष फकिरा रानोजी साठे यांच्या वंशज व कुटुंबियांना मातंग समाजाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असून राज्य शासनाने आर्थिक मदत करीत नाही या दोन्ही महापुरुषांचे वंशज आज अत्यंत गरिबी मध्ये जीवन जगत आहे लोकशाहीर आन्नाभाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीमाई मधुकर साठे या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोजंदारी ने कामाला जाऊन या रोजंदारी वरच आपला प्रपंच चालवित आहेत काही दिवसापूर्वी श्रीमती सावित्रीबाई साठे यांच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे त्यांना आता नीट चालता येत नाही व काम धंदा सुद्धा करता येत नाही या सर्व परिस्थितीमुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे दुसरीकडे वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील वास्तवात असलेले फकिरा रानोजी साठे यांच्यावर ज्या अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा नावाची कादंबरी लिहून प्रकाशित केली होती आणि त्या कादंबरीला तत्कालीन राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्याच फकिरा रानोजी साठे यांच्या कुटुंब यावर सुद्धा उपासमारीची पाळी आली असून हे कुटुंब सुद्धा गावांमधील काही पडलेली कामे करून जीवन जगत आहे आणि राज्य शासन दरवर्षी अण्णाभाऊ साठे आणि फकिरा रानोजी साठे यांची जयंती व पुण्यस्थिती साजरी करत असते राज्य शासनाकडून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नाट्यगृह शाळा कॉलेज विद्यालय महामंडळ दवाखाने एवढेच काय तर अनेक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारीत आहे पण ज्यांना भाऊ साठे यांनी सामाजिक क्रांती केली त्या अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष फकिरा रानोजी साठे या दोन्हीही महापुरुषांच्या निवासस्थानाला भेट देऊन आणि दोन्ही कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सौ रुपाली ताई चाकणकर महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष यांना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी मंत्रालय मुंबई येथे जाऊन निवेदन दिले बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि वीरपुरुष फकिरा रानोजी साठे या महामानवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे जर का लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर पुरुष साठे यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत देण्यास विलंब लागला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट रोजी जयंती दिनापासून राज्य सरकारच्या विरोधात बहुजन जनता दल मुंबई येथील आझाद मैदानावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीरपुरुष फकिरा रानोजी साठे यांच्या कुटुंबीयांना जोपर्यंत शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असा इशारा बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे

Post a Comment

0 Comments