डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मा संदेश आंबेडकर यांचा मुंबई येथे ५ एप्रिल रोजी बहुजन जनता दल मध्ये जाहीर प्रवेश-पंडितभाऊ दाभाडे‌‍‍

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मा संदेश आंबेडकर यांचा मुंबई येथे ५ एप्रिल रोजी बहुजन जनता दल मध्ये जाहीर प्रवेश-पंडितभाऊ दाभाडे‌‍‍


पुणे (प्रती) शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या चळवळीला रिपाइं नेत्यांनी गटातटात विखरून स्वतःला  आंबेडकरवादी म्हणणाऱ्या नेत्यांनी रिपाई चळवळीला शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा यांच्या दावणीला बांधून रिपाइं नेत्यांनी यामध्येच आपली धन्यता मानून कारकीर्द संपवून बसलेल्या रिपाई नेत्यांना आता शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात थारा देत नाही ,विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि चुलत पणतू असलेले मा, संदेश अशोकराव आंबेडकर यांनी असा आरोप करून बहुजनांचे युवा नेतृत्व करणारे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे मी यांनाच आपला नेता म्हणून स्वीकारले असून आणि यांच्या खंबीर नेतृत्वावर मोठा विश्वास व्यक्त करून मि आपल्या समर्थकांसह येणाऱ्या 5 एप्रिल २०२२ मंगळवार रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे दुपारी २ वाजता बहुजन जनता दलामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे अशी माहिती बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडीत भाऊ दाभाडे यांनी दिली आहे
         मा, संदेश आंबेडकर यांच्या बहुजन जनता दल जाहीर प्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्ष (छत्रपती शाहू ‌महाराज यांचे वंशज )असलेले खासदार छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित राहणार असून (महात्मा ज्योतिबा फुले )यांचे चुलत नातु असलेले काशीराम फुले, (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे )यांच्या सुनबाई श्रीमती सावित्री माई साठे व (फकिरा रानोजी साठे) यांचे वंशज असलेले किरण साठे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असुन बहुजन जनता दलाचे केशव गंगणे (नगरसेवक) रामदास डोरले (नगरसेवक) सौ प्रमोदिनी डावखरे (नगरसेविका) संजय डावखरे (सरपंच) दादू राम कोळी (सरपंच) इंदिरा कामधेनु (ग्रा प सदस्य) तुकाराम कोतकर (ग्रा, प सदस्य) शीला बरकडे (ग्रा प सदस्य) किशोर गावंडे (ग्रा प सदस्य) यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे‌ यांनी दिली असून मा संदेश आंबेडकर यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला राज्यातील सर्व आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष महिला आघाडी युवा आघाडी कामगार आघाडी. मनपा. नपा कर्मचारी आघाडी ‌ आणि कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ खांडेकर प्रतिक दाभाडे (युवा प्रदेशाध्यक्ष )शिवाजीराव थोरात (फिल्म सिटी प्रदेशाध्यक्ष )अक्षय तागडे (फिल्म सिटी विदर्भ अध्यक्ष )अंकुश पवारे प्रदेश उपाध्यक्ष, संजय वानखडे प्रदेश संघटक, हिम्मतराव पाटील ,प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पाटील प्रदेश सचिव यांनी केले आहे असे कार्यक्रमाचे आयोजक आणि बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे‌ यांनी दिलेल्या प्रसिद्धीस पत्राद्वारे कळविले आहे

Post a Comment

0 Comments