मतदारांचा प्रतिनिधींवर अंकुश असावा - रविदादा मानव

मतदारांचा प्रतिनिधींवर अंकुश असावा - रविदादा मानव


       वरोरा(प्रती)  जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारत असून लोकशाही चे स्वरूप स्विकारले आहेत यामध्ये मतदार हा देशाचा मालक म्हणून मतदान करतो आणि आपला प्रतिनिधी निवडतो आणि निवडणुक आलेले प्रतिनिधी हे लोकसभा,विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतचा सदस्य होतो निवडुन येणारे प्रतिनिधी आपआपल्या क्षेत्रात मतदारांच्या सेवार्थ सभागृहामध्ये प्रतिनिधीत्व करतो मतदारांचे काम मतदान करून संपत नसून प्रतिनिधींवर अंकुश असला पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिध्द राष्ट्रीय व्याख्याते रविदादा मानव, अध्यक्ष गुरूकुल मोझरी यांनी सेवा ग्रुप, आनंदवन चौक, वरोरा येथे आयोजित शिवजयंती तथा तीन दिवसीय समारोपीय  समारंभात केले.
          रविदादा पुढे म्हणाले की डीजे वाजून शिवजयंती साजरी होत नसते तर शिवरायांचे विचार उराशी बाळगुन समाजात परिवर्तन होण्यासाठी संघर्ष उभा करावा लागतो व या संघर्षातून लोकशाही टिकावी व बळकट व्हावी अशा पध्दतीचे कार्य करूनच खरी शिवजयंती साजरी करता येईल. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर रोगनिदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.
             कार्यक्रमाची प्रस्तावना किसान पुत्र संघटननेचे नरेंद्र जीवतोडे यांनी केली. या कार्यक्रमात डॉ. अंकुश आगलावे यांनी छ.शिवाजी महाराज यांनी केलेली कार्याचा आढावा घेतला. यावेळी ग्रामगीताचार्य प्रा.कावळे सर, भाउुराव वैद्य गुरूजी बघेल ठेकेदार, टिपले सर, रमेश राजुरकर तसेच सेवा ग्रुपचे अध्यक्ष निखिल मांडवकर , उपाध्यक्ष कृष्णा ढोके, सचिव वैभव ठाकरे, सहसचिव महेश बिबटे , कोषाध्यक्ष अजिंक्य अंबाडे, व वैभव कोवे, तेजस चहांदे, महेश डेंगळे , मोनेश भोयर , देवेंद्र देठे, रूपेश चिंचोलकर , रोहित मेश्राम, अक्षय नागापूरे   व समस्त सेवा ग्रुपचे फाऊंडेशचे सदस्य, शिवभक्त व अनेक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments