शालेय अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेचा अभ्यास समाविष्ट करावा - अमर गोंडाने


           शालेय अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेचा अभ्यास समाविष्ट करावा - अमर गोंडाने


चंद्रपूर(प्रती)इयत्ता ८वी ते इयत्ता १२वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेचा अभ्यास समाविष्ट करावा अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रदेश प्रवक्ता अमर गोंडाने यांनी शालेय शिक्षण मंत्री ना .वर्षाताई गायकवाड याच्या कडे नुकतीच मेलव्दारे केली.
      गुजरात सरकार ने नुकताच इयत्ता ६वी ते इयत्ता १२वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवतगीता शिकवली जाईल असा निर्णय घेतला; याचं निर्णयाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले. भारतीय जनता पार्टी चे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले व भाजपाचे आमदार राम कदम यांनी माननीय शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे मागणी केली की, महाराष्ट्र सरकार नी सुद्धा शालेय अभ्यासक्रमात भगवतगीता शिकवली जावी. भाजपच्या या मागणीचा अमर गोंडाने यांनी विरोध केला असून; आजच्या विज्ञान युगात आपण जगत आहो, या २१व्या शतकाच्या वर्तमानात  जगत असतांना सनातनी भगवतगीता ग्रंथाचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी कितपत योग्य असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे,  शिक्षण क्षेत्रात सदर बाब समाविष्ट केल्यास ,आजचा विदयार्थी अंधश्रद्धेच्या आहारी जाईल, असे अमर गोंडाने यांनी पत्रकात म्हटले आहे,  तसेच या देशात विविध धर्माचे लोक राहतात ,त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या धर्माचे धर्मग्रंथाचे शिक्षण शिकवले जावे अशी मागणी करतील,
. त्यामुळे सामाजिक एकता व अखंडतेला बाधा निर्माण होऊ शकते व समाजिक सुव्यवस्था बाधित झाल्या शिवाय राहणार नाही,  अशी शक्यता नाकारताही येत नाही असे ते म्हणाले.
       ना. वर्षाताई गायकवाड (शालेय मंत्री मा.राज्य) यांच्या कडे निवेदनात अमर गोंडाने असे म्हणतात की भारत देश हा धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र असून भारताची राज्यघटना ही सर्वांना स्वातंत्र, न्याय, समानता व बंधुता ही मूल्य बहाल करते. महामानव डॉ, बाबासाहेबांनी आपल्या अखंड मेहनतीच्या जोरावर घटनेची निर्मिती केली जेणेकरून या देशातील वंचित, शोषित ,पीडित लोकांना त्यांचे मूलभूत हक्क, न्याय व स्वतंत्र मिळावे या हेतूने
 राज्यघटनेच्या माध्यमातून  या देशातील प्रत्येक वर्गाला समान संधी उपलब्ध करून दिली, सर्वांना समान वागणूक दिली विज्ञानाच्या आधारावर राज्यघटना लिखित असून यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही, सर्वांना समान वागणूक, समान अधिकार,समानतेचे हक्क ,सर्वांना दिले म्हणून या देशातील पिढी प्रगतीशील व्हावी, आणि भावी  पिढीच्या भविष्यासाठी शालेय अभ्यास क्रमात  राज्यघटनेचा अभ्यास शिकवला गेला तर देशात एकता अखंडता ,एकात्मता ,स्वातंत्र्य, बंधुता अबाधित राहील, आणि विद्यार्थी घडेल,
       म्हणून इयत्ता ८वी
 ते इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना भारताची राज्यघटना शिकवली जावी अशी मागणी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अमर गोंडाने यांनी एका पत्रकात केली आहे,

Post a Comment

0 Comments